Sunday, October 6, 2024

/

रेल्वे..’बोगी हॉटेल’ चे थाटात उद्घाटन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :नैऋत्य रेल्वेच्या अखत्यारीतील एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखले जाणारे बोगी हॉटेल शनिवार दि. ३० पासून बेळगावकरांच्या सेवेत दाखल झाले. नैऋत्य रेल्वेचे चौथे आणि बेळगावातील पहिले चोवीस तास हॉटेलचे उद्घाटन खासदार मंगला अंगडी यांनी केले. मॅग्नम फूड्स कंपनीच्या माध्यमातून या हॉटेलचा कार्यारंभ करण्यात आला.

शनिवारी सायंकाळी सहा वाजता भव्य उद्घाटन कार्यक्रम झाला. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ, बेळगाव रेल्वे स्थानकाचे स्टेशन मॅनेजर डी. अश्विनीकुमार, चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर भिमाप्पा तसेच रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

बोगी हॉटेलचा प्रकल्प महत्वाकांक्षी आहे. रेल्वेची सेवा सातत्याने चोवीस तास सुरु असते. दरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेस्थानक आवारातच अतिशय दर्जेदार आणि चोवीसतास खाद्यपदार्थ मिळावेत आणि तेही रेल्वेच्या सजवलेल्या बोगीतच खाता यावेत अशी संकल्पना आहे. काही महत्वाच्या शहरातील रेल्वे स्थानकांवर ही सोय उपलब्ध करण्यात आली असून त्यामध्ये बेळगाव शहराचाही समावेश झाला आहे. अशी माहिती स्टेशन मॅनेजर डी. अश्विनीकुमार यांनी दिली.

विशेष म्हणजे या बोगी हॉटेलची व्यवस्था मुख्य रेल्वेस्थानकापासून बाहेर अर्थात प्रवेशद्वारातच असल्याने बाहेरील खवय्येसुद्धा येथील पदार्थांचा चोवीस तास लाभ उठवू शकणार आहेत. तशी सर्व सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी सर्वप्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी भोजन प्रकार, स्नॅक्स आयटम, बिर्याणी तसेच इंडियन, चायनीज आणि काँटिनेंटल आयटम्स चाखायला मिळणार आहेत. अशी माहिती उपलब्ध झाली आहे. असे ते म्हणाले.

आमदार राजू शेठ यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले. रेल्वेच्या या प्रकल्पाचा लाभ अनेक प्रवाशांना तसेच बाहेरील खवय्यांना सुद्धा होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.Bogi hotel

खासदार मंगला अंगडी यांनी एका बोगीला सुंदररित्या सजवून तयार केलेले रेस्टॉरंट पाहण्यासारखे आहे. दरम्यान हे साकारणाऱ्या magnum फुड्स चे कौतुक करावे तितके थोडे आहे. असे उद्गार काढले.

Magnum फुडस चे मालक तनिष्क कुगजी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. व्यासपीठावर संचालिका अश्वगंधा कुगजी उपस्थित होत्या.

३१ डिसेंबर पासून बोगी हॉटेल खाद्यपदार्थांसाठी उपलब्ध होईल आणि नवीन वर्षात बेळगावच्या खाद्यप्रेमींसाठी एक अनोखी भेट असणार आहे. यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी बेळगावकर उद्या मोठ्यासंख्येने दाखल होणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.