Thursday, May 2, 2024

/

विमानतळावर वाहन प्रवेश ते निर्गमन कालावधी 10 मि.

 belgaum

बेळगाव लाईव्ह :प्रवाशांची ने -आण करणाऱ्या वाहनांसाठी बेळगाव विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या ठिकाणी प्रवेशापासून निर्गमनापर्यंतचा कालावधी 10 मिनिटांचा असणार आहे. यामध्ये 3 मिनिटांच्या पिकअप /ड्रॉप कालावधीचा समावेश असेल असे बेळगाव विमानतळातर्फे कळविण्यात आले आहे.

बेळगाव विमानतळाच्या ठिकाणी वाहने थांबवणे आणि पार्किंग या संदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी पार्किंग न करता विमानतळाच्या ठिकाणी एखादे वाहन किती वेळ थांबू शकते यासंदर्भात विमानतळ प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.

त्यानुसार बेळगाव विमानतळ टर्मिनल इमारती समोरील लेनमध्ये प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा नेण्यासाठी वाहनांना 3 मिनिटे थांबता येऊ शकते. तथापि त्यांच्यासाठी विमानतळ टर्मिनल इमारतीच्या ठिकाणी प्रवेशापासून निर्गमनाचा अर्थात बाहेर पडण्याचा एकूण कालावधी 10 मिनिटांचा (7 मि. + 3 मि. थांबण्याचा वेळ) असणार आहे. पिकअप /ड्रॉपसाठी वाहनांनी विमानतळाच्या टर्मिनल इमारती समोर थांबण्याच्या 3 मिनिटांच्या कालावधी पेक्षा जास्त वेळ थांबल्यास पार्किंग शुल्काच्या चौपट दंड (140 रु.) आकारला जाईल.Virat

 belgaum

प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी येणारी वाहने निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ न थांबता नेहमीच्या मार्गाने थेट टर्मिनल इमारतीपर्यंत येऊ शकतात.

विमानतळ आवारातील प्रवेशाच्या ठिकाणी दिले जाणारे टोकन हे टर्मिनल इमारती समोर 3 मिनिट थांबण्याच्या वेळेसाठी दिले जाते, असे बेळगाव विमानतळाच्या संचालकांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.Mahila aaghadi

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.