Saturday, June 15, 2024

/

गरजू विवाहितेच्या शस्त्रक्रियेसाठी ‘यांनी’ केली आर्थिक मदत

 belgaum

बेळगाव लाईव्ह :वडगाव येथील कोमल भुजंग चापोलीकर या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या विवाहितेला माजी मुख्याध्यापक किशोर खोकले यांनी आपला मित्र अनिल पोतदार याच्या मदतीने तात्काळ 5 हजार रुपयांची मदत देऊ केली आहे.

पाटील गल्ली, वडगाव येथील कोमल चापोलीकर (वय 28) हिच्या छातीतील गाठीच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या बंधूने बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सेंट जर्मन्स इंडियन स्कूलचे माजी मुख्याध्यापक किशोर पी. खोकले यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि त्यांचे मित्र पोतदार ज्वेलर्स खडेबाजारचे अनिल पोतदार यांच्या मदतीने कोमल हिच्या शस्त्रक्रियेसाठी 5000 रुपयांची मदत देऊ केली आहे.Help needy patient

 belgaum

कोमल चापोलीकर यांच्यावर सध्या विजय ऑर्थो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. माजी मुख्याध्यापक किशोर खोकले यांनी केलेल्या मदतीबद्दल चापोलीकर कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले आहेत.

शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.