बेळगाव लाईव्ह :पाटील गल्ली, वडगाव येथील रहिवासी कोमल भुजंग चापोलिकर (वय 28) यांच्यावरील तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
कोमल चापोलीकर यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून त्यांचे पती वडगावमध्ये मागावर कामाला जातात. कोमल यांच्या डाव्या बाजूला छातीमध्ये गाठ झाली आहे. सदर गाठ चिघळल्यामुळे कोमल यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून डॉक्टरांनी तातडीच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे.
कोमल यांच्यावर विजया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून शस्त्रक्रियेसाठी 30 हजार रुपये इतका खर्च सांगण्यात आला आहे. हा खर्च चापोलीकर परिवाराच्या अवाक्या बाहेरील असल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.
तरी शहरातील दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन आपली बहीण कोमल चापोलीकर हिला तिच्या 9731753664 या फोन पे क्रमांकावर आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन कोमलचे बंधू निरंजन बिर्जे यांनी केले आहे.