Friday, May 24, 2024

/

चिक्कोडी स्वतंत्र जिल्हा करा; आम. हुक्केरी यांची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :चिक्कोडी तालुक्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा दिला जावा, अशी जोरदार मागणी चिकोडी -सदलगा मतदार संघाचे आमदार गणेश हुक्केरी यांनी आज विधानसभेत केली.

बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या आज शुक्रवारी अखेरच्या दिवशी उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध आमदारांनी उत्तर कर्नाटकातील समस्यांचा पाढा वाचला. आमदार गणेश हुक्केरी यांनी यांनी यावेळी बोलताना तालुक्यातील लोकसंख्या, सामर्थ्य आणि मागण्या लक्षात घेऊन चिक्कोडी तालुक्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणी केली.

चिक्कोडी तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा मिळावा अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यापूर्वी सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना चिक्कोडी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि चिक्कोडी जिल्हा संघर्ष समितीच्यावतीने सिद्धरामय्या यांना निवेदन देण्यात आले होते.

 belgaum

सध्या बेळगाव जिल्हा केंद्र असल्यामुळे शेतकऱ्यांना अथणी येथून बेळगावला येण्यासाठी मोठ्या प्रवास करावा लागतो. कांही तासात होणाऱ्या सरकारी कामासाठी बऱ्याच जणांना बेळगावमध्येच मुक्काम ठोकावा लागतो. या सर्व प्रकारामुळे मनस्ताप होण्याबरोबरच वेळेचा अपव्यय तर होतोच शिवाय पैशाचा भुर्दंडही सहन करावा लागतो. यासाठी चिक्कोडी तालुक्याला स्वतंत्र जिल्हा म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी आमदार हुक्केरी यांनी सरकारकडे केली.Hukkeri

चिक्कोडी तालुक्यात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.

या समस्येचे निवारण करण्यासाठी महालक्ष्मी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जावी. या योजनेसाठी निविदाही मंजूर झाली असल्यामुळे योजनेचे काम लवकरात लवकर सुरू केले जावे, ही मागणी दखील आमदार गणेश हुक्केरी यांनी विधानसभेत केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.