Saturday, December 7, 2024

/

‘ त्या’ घटनेचे तथ्य शोधण्यासाठी भाजपची 5 सदस्य समिती

 belgaum

बेळगाव लाईव्ह : न्यू वंटमुरी गावात अन्याय झालेल्या त्या पीडित महिलेला  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्य सरकारच्या वतीने पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे, असे जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले  आहे याशिवाय पीडित महिलेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ५० हजार रुपयांची भरपाईही जाहीर करण्यात आली आहे.

भाजप राष्ट्रीय अध्यक्षांकडून ‘त्या’ नींद घटनेचा निषेध’ त्या’ घटनेचे तथ्य शोधण्यासाठी भाजपची 5 सदस्य समिती

कर्नाटकातील बेळगावमध्ये एका आदिवासी महिलेची विवस्त्र धिंड काढण्याची जी अत्यंत नींद घटना नुकतीच घडली तिचे तथ्य, वस्तुस्थिती शोधण्यासाठी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी 5 सदस्यीय समिती नेमली असल्याची माहिती भाजप राष्ट्रीय सरचिटणीस व मुख्यालय प्रमुख अरुण सिंग यांनी आज एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

कर्नाटकातील बेळगावमध्ये आदिवासी महिलेची विवस्त्र धिंड काढण्याच्या अतिशय निंद्य घटनेचा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी तीव्र निषेध केला आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून विशेष करून महिलांच्या बाबतीत सातत्याने गुन्हे घडत आहेत. यावरून देशभरातील या पद्धतीचे गुन्हे हाताळण्याच्या बाबतीत काँग्रेस सरकारचे बेजबाबदार वर्तन उघड होते. राष्ट्रीय अध्यक्षांनी बेळगाव येथील घटनास्थळी भेट देऊन तथ्य शोधण्यासाठी 5 जणांची तथ्य शोध समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये खासदार श्रीमती अपराजिता सारंगी, खासदार श्रीमती सुनिता दुग्गल, खासदार श्रीमती लॉकेट चॅटर्जी, खासदार श्रीमती रंजिता कोळी आणि राष्ट्रीय सचिव डॉ. श्रीमती आशा लाक्रा यांचा समावेश आहे. ही समिती लवकरात लवकर आपला अहवाल पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडे सादर करेल, अशा आशयाचा तपशील भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

दरम्यान कर्नाटकातील भाजप खासदारांनी या घटने विरोधात दिल्लीत महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्या समोर आंदोलन देखील केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.