Sunday, May 19, 2024

/

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची मनपा आयुक्तांना देण्यात आली कल्पना

 belgaum

बेळगाव लाईव्ह:कृषी कायदा 2020 रद्द करण्यात यावा या मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या 4 डिसेंबर 2023 रोजी बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेने महापालिका आयुक्तांना कळविले आहे.

कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेने एका निवेदनाद्वारे आपल्या आंदोलनाची माहिती महापालिका आयुक्तांना दिली आहे.SUvarna soudha

ऊसाला प्रतिक्विंटल 25 हजार रुपये दर देण्यात यावा, उसाच्या एफआरपी सोबत एसएपी भरला जावा, कृषी कायदा 2020 रद्द केला जावा, महागाई आणि मेकेदाटू योजना लवकरात लवकर सुरू कराव्यात, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जावे,

 belgaum

दुष्काळी मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावा, शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा येणे बंद केले जावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर आंदोलन छेडले जाणार असल्याचे कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेने मनपा आयुक्तांना कळवले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.