Sunday, April 21, 2024

/

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर खटला निकालाकडे

 belgaum

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवल्यानंतर शांततेत आंदोलन करणार्‍या जनतेवर अमानुष मारहाण करण्यात आली.

त्यानंतर आंदोलन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आहे. या सात खटल्यातील एक खटला निकालाकडे आला असून पुढील सुनावणी 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

येळ्ळूर खटल्याप्रकरणी मंगळवारी (दि. 10) न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणीला म. ए. समितीचे सर्व 26 संशयित उपस्थित होते. न्यायालयात त्यांचा जवाब नोंदवण्यात आला.

याआधी न्यायालयाने फिर्यादी एसीपी नारायण बरमणी सुनावणीला वारंवार गैरहजर असल्यामुळे खटल्यातून नाव काढून टाकण्याचा आदेश दिला होता. आज झालेल्या सुनावणीत सर्व संशयितांचे जवाब नोंदवण्यात आले. गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेला हा महत्वाचा खटला निकालाकडे आला आहे. 18 ऑक्टोबर रोजी महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.Yellur state

पोलिसांनी महाराष्ट्र राज्य येळ्ळूरप्रकरणी एकूण 222 जणांवर गुन्हे नोंदवले आहेत. एकूण सात खटले असून त्यापैकी पहिल्या खटल्यातील जबान्या पूर्ण झाल्या आहेत. येळ्ळूरच्या जनतेच्या वतीने अ‍ॅड. शामसुंदर पत्तार, अ‍ॅड. हेमराज बेंचण्णावर आणि अ‍ॅड. शाम पाटील, अ‍ॅड मारुती कामांनाचे हे काम पाहात आहे.

न्यायालय आवारात आज सर्व जण जमले होते. यावेळी अ‍ॅड. मारूती कामाणाचे यांच्यासह म. ए. समितीचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.