Sunday, April 28, 2024

/

काळा दिन गांभीर्याने पाळा: मध्यवर्ती  समिती

 belgaum

बेळगाव लाईव्ह :1 नोव्हेंबर काळ्यादिनी मराठी भाषिकांनी फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारला ताकद दाखवून द्यावे, आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

​मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक मंगळवारी (दि. 10) मराठा मंदिर सभागृहाच्या कार्यालयात पार पडली. विधान सभा निवडणुकी नंतर तब्बल तीन महिन्यांनी सदर बैठक विधान सभा निवडणुकी नंतर पहिल्यांदा ही बैठक झाली आहे.

अध्यक्षस्थानी अ‍ॅड. राजाभाऊ पाटील होते.
सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी, सीमाप्रश्नाची तड लागावी यासाठी मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि इतर नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे प्रश्नाला लवकरच चालना मिळेल, असे सांगितले.Mes meet

 belgaum

अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यांनी, समिती गेल्या अनेक वर्षांपासून अन्यायाविरोधात लढा देत आहे. आपली लढाई सरकारविरोधात असल्याने मराठी भाषिकांनी दरवर्षीप्रमाणे काळया दिनाच्या फेरीत प्रचंड संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा. एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातून आमदार किंवा इतर कोणी येणार असेल तर त्याबाबतची माहिती मध्यवर्तीकडे द्यावी. महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायालयात 21 वादाचे मुद्दे आहेत. आगामी काळात सुनावणी होणार असल्याने समितीला आपली तयारी पूर्ण करावी लागणार आहे, असे सांगितले.

उच्चाधिकार समितीची बैठक लवकर घेण्यात यावी, यासाठी महाराष्ट्राकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सर्वांनी मध्यवर्ती समितीच्या ध्येय धोरणांची कायम राहून काम करावे. आपण कर भरतो त्यामुळे विकास करणे हे सरकारचे काम आहे. निवडणुकीत पराभव झाला तरी न्यायालयीन दाव्याला कोणतीही बाधा येऊ नये याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. प्रत्येकाने समितीसाठी ज्यांनी त्याग केला आहे, त्यांच्या कार्याची जाण ठेवावी आणि समितीशी कधीही गद्दारी करू नये, असे मध्यवर्ती समिती सरचिटणीस यांनी सांगितले.

रणजीत चव्हाण-पाटील, आबासाहेब दळवी, खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, अ‍ॅड. एम जी पाटील, मारुती परमेकर, मुरलीधर पाटील, बी. डी. मोहनगेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीला बी. एस. पाटील, रावजी पाटील, निरंजन सरदेसाई, रणजीत पाटील, रमेश धबाले, रामचंद्र गावकर, नानू पाटील, विकास कलघटगी, एस. एल. चौगुले, जयराम देसाई, रुक्मान्ना झुंजवाडकर, रवींद्र शिंदे आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.