Sunday, September 1, 2024

/

भावे चौकातील ‘या’ गटारीकडे लक्ष देण्याची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :नरगुंदकर भावे चौकातील अनेक वर्षापासून साफसफाई अभावी बंदिस्त तुंबलेल्या अवस्थेत असलेल्या गटारीकडे महापालिकेच्या आरोग्य खात्याने तात्काळ लक्ष तिची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.

शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील नरगुंदकर भावे चौकातील एका बाजूची गटार गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे.

या मार्गावरील दुकानदारांनी फरशा घालून अथवा बांधकाम करून सदर गटार बंदिस्त केली असल्यामुळे साफसफाई अभावी सध्या बऱ्याच ठिकाणी ती तुंबली आहे.

या तुंबलेल्या गटारीमुळे दुर्गंधी पसरत असून ज्यामुळे येथील दुकानदार व व्यापारी त्रस्त झाले आहेत. तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर गटारीची युद्धपातळीवर स्वच्छता करावी अशी मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.