Friday, May 24, 2024

/

असा झाला आरोग्य मदतीचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय

 belgaum

बेळगाव लाईव्ह: सीमाभागातील मराठी जनतेला महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मोफत योजने संदर्भात या अगोदर अधिवेशनात चर्चा होऊन शासकीय निर्णय झाला होता मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती अनेक तांत्रिक बाबी समोर येत होत्या त्यामुळे रुग्णांना त्याचा लाभ घेता येत नव्हता यासाठी बुधवारी मुंबई मंत्रालयात झालेल्या तज्ञ समिती बैठकीत निर्णय झाला.

तज्ञ समिती बैठकी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओ एस डी मंगेश चिवटे यांनी खासदार धैर्यशील माने यांना विनंती करून बैठक संपल्यावर खास आरोग्यासाठी एक छोटी बैठक घेतली त्यात हा मॅरेथॉन निर्णय झाला.

याआधी गेल्या 8 जून 2022 रोजी तज्ज्ञ समितीची बैठक झाली होती. त्यानंतर तज्ज्ञ समितीची बैठक झाली नव्हती, ती काल 11 ऑक्टोबर 2023 रोजी मंत्रालयामध्ये तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर आता येत्या 8 -15 दिवसातच सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहे.

 belgaum

त्या बैठकीपूर्वी सर्व निर्णयांवर शिक्कामोतर्ब केले जाणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे सचिव पालवे, मुख्यमंत्री मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, रमाकांत कोंडुसकर, माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर, प्रकाश मरगाळे, शिवराज सावंत सागर पाटील यांच्यासह सीमा कक्षाच्या अधिकाऱ्यांची तज्ञ समितीच्या बैठकीनंतर विशेष बैठक झाली.Health

सदर बैठकीमध्ये प्रामुख्याने वैद्यकीय मदत सीमावासियांपर्यंत कशी त्वरेने पोहोचविता येईल? यावर सविस्तर चर्चा झाली. प्रारंभी महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा जीआर होऊन ती बेळगावच्या केएलई हॉस्पिटलसह चंदगड वगैरे ठिकाणी महाराष्ट्रात लागू झाली आहे. मात्र या योजनेचा लाभ अद्याप सीमा भागातील लोकांना मिळत नाही आहे. यासाठी महात्मा फुले योजना केएलई हॉस्पिटलसह इतर हॉस्पिटल्समध्ये सीमावासियांसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठकीत सांगोपांग चर्चा झाली.

विशेष म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिफारस पत्रावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत महाराष्ट्रातील अनेक हॉस्पिटल्समध्ये सीमा भागातील रुग्णांना कशी मदत मिळवून देता येईल यावर देखील चर्चा करण्यात आली.

यावेळी मंगेश चिवटे व पालवे यांनी तांत्रिक मुद्दे जाणून घेतले मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने विकास कलघटगी, रमाकांत कोंडुसकर, सागर पाटील आदींनी सूचना मांडल्या. एकंदरच या बैठकीमध्ये मध्यवर्तीय समितीच्या शिफारस पत्रावर प्रत्येक रुग्णाला आता मोफत उपचार घेता येणार आहेत आणि आगामी काळात नवीन जीआर काढून महात्मा फुले आरोग्य योजनेची अंमलबजावणी बेळगाव मधील रुग्णांसाठी केली जाणार आहे. विशेष बैठकीस सीमा कक्षाचे अधिकारी, वैद्यकीय कक्षाचे अधिकारी आणि खासदार धैर्यशील माने यांच्यासह माजी मंत्री सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.