belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महा पालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केलेल्या कार्यकर्ते च्या बातम्या आपण दररोजच वाचत आहोत. गुरुवारी देखील याच बातमीचा प्रत्यय पुन्हा एकदा बेळगावकरांना पाहायला मिळाला. समस्या घेऊन जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना फोन केलेल्या दहा मिनिटातच त्या स्थळी जेसीबी दाखल झाला आणि काम पूर्ण झाले.

गुरुवारी मनपा आयुक्तांच्या कार्य तत्परतेची समजलेली हकीकत अशी की
शहापूर येथील जनावरांच्या स्मशानभूमीत साचलेल्या कचर्‍याबाबत फेसबुक फ्रेंड सर्कलने जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे तक्रार करताच दहा मिनिटात जेसीबी पाठवून स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली.

दोन ठिकाणी मृत झालेल्या बेवारस जनावरांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी फेसबुक फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते शहापूर स्मशानभूमीत गेले होते. त्याठिकाणी स्मशानात गवत वाढले होते. कचरा टाकण्यात आला होता.Ccb

त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना फोनवरून माहिती देण्यात आली.

दोघांनीही त्याची दखल घेत दहा मिनिटांत जेसीबी पाठवून स्मशानाची स्वच्छता केली. अधिकार्‍यांनी मागणीची तत्काळ दखल घेतल्यामुळे कार्यकर्त्यांत समाधान व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.