Saturday, November 9, 2024

/

तालुका समितीची चिंतन बैठक शहर कधी घेणार?

 belgaum

विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने बैठक आयोजित केली आहे मात्र शहर समिती कारण मीमांसा बैठक कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवार दिनांक 26 रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओवरब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे.

तरी या बैठकीमध्ये एक जून 1986 मधील कन्नड सक्तीतील हुतात्म्यांना अभिवादन तसेच विधानसभा निवडणुकीतील चिंतन बैठक व अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विधानसभा निवडणुकीतील निवड कमिटी सदस्यांनी,युवा आघाडीचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी,

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस वकील एम जी पाटील यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.