belgaum

बेळगाव लाईव्ह : कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांनी गणेशोत्सवात पोलिसांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गणेश मंडळांच्या तक्रारी ऐकण्यासाठी शहरात बुलेट फेरी काढली.

डीसीपी रोहन जगदीश, माळमारुती सीपीआय जे. एम. कालीमिर्ची, पीएसआय होनप्पा तळवार, श्रीशैल गुलगेरी आणि ठाण्याचे हवालदार यांनी दुचाकीवरून पोलीस स्टेशन परिसरात फेरी मारून गणेश दर्शनासह मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.

अंजनेय नगरच्या गणेश मंडपामध्ये बुलेटवर आलेले रोहन जगदीश आणि माळमारुती पोलिस स्टेशनचे सीपीआय कालिमिर्ची यांचे अंजनेय नगरच्या गणेश मंडळ व स्थानिक रहिवाशांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.Dcp bike drive

डीसीपीं जगदीश यांनी गणेश दर्शनात सहभागी होऊन आशीर्वाद घेतले. रोहन जगदीशने यांनी सर्वप्रथम माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलेट राऊंड घातला असून शहरातील विविध भागात ते बुलेटवरून फिरणार आहेत.11 shivaji

अलीकडेच डी सी पी जगदीश यांनी पदभार स्वीकारला आहे नव्या दमाचे ते आय पी एस अधिकारी आहे गणेश उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी कोणताही अधिकारी जर बेळगावला रुजू झाला त्याच्यावर  गणेश उत्सवाची मोठी जबाबदारी असते. जगदीश स्वतः लीड करत गणेश बंदोबस्त हाताळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच जनतेच्या सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते दुचाकीवरून फिरत आहेत.

https://x.com/belgaumlive/status/1704889948371865957?s=20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.