Saturday, July 13, 2024

/

आमदार कौजलगींच्या वाहनाला अपघात

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांच्या वाहनाला सोमवारी बंगळूरमधील विधानसौधनजिक अपघात झाला.

त्यात आमदार कौजलगी किरकोळ जखमी झाले असून वाहनाचे नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद कब्बन पार्क रहदारी पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, आमदार भवनातून येत असताना आमदार कौजलगी यांच्या कारला मागून भरधाव वेगाने येणार्‍या एका कारने धडक दिल्याने हा अपघात घडला.

अपघातात किरकोळ जखमी झालेल्या आमदार कौजलगींना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच कब्बन पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.