Monday, April 29, 2024

/

डॉ. संजीव नांद्रे मनपाचे नवे आरोग्य अधिकारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांची बदली झाली असून नवे आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. संजीव नांद्रे यांनी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

महापालिकेचे नूतन आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे हे खानापूर तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्याआधी त्यांनी बेळगाव तालुका आरोग्य अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. बेळगाव महापालिकेचे मावळते आरोग्य अधिकारी डॉ. डुमगोळ यांची बेळगाव जिल्हा अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

तत्कालीन प्रादेशिक आयुक्त व महापालिका प्रशासक आदित्य आमलान बिश्वास यांच्या सूचनेवरून 2019 मध्ये त्यांची महापालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2020 मध्ये कोरोना काळात त्यांनी बेळगाव तालुका आरोग्य अधिकारी म्हणून सेवा बजावली होती.

 belgaum

पुढे कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यावर डॉ. संजय डुमगोळ यांची पुन्हा महापालिकेत नियुक्ती झाली होती. आता लवकरच ते आपल्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे बेळगाव जिल्हा अन्नसुरक्षा अधिकारी पदावर रुजू होणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.