Thursday, May 23, 2024

/

‘त्या’ ऑटो चालकाचा ‘सेंट जोसेफ कॉव्हेन्ट शाळेकडून सत्कार

 belgaum

बँकेत पैसे भरायला जाणाऱ्या व्यापाऱ्याची अनावधानाने रस्त्यावर पडलेली 2.5 लाख रुपये असलेली बॅग एका ऑटो रिक्षा चालकाने कॅम्प पोलिसांसमक्ष त्या व्यापाऱ्याला सुखरूप परत करून दुर्मिळ प्रामाणिकपणाचे दर्शन घडविल्याची घटना नुकतीच शहरात घडली होती

शाळेतील मुलींचा वर्दी करणाऱ्या ऑटो चालकाने दाखवलेल्या प्रामाणिक बद्दल सेंट जोसेफ शाळेच्या सभागृहात शाळेच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेच्या वतीनं रिक्षाचालक अनंत शंकर होसुरकर यांचा सत्कार करण्यात आला.

सेंट जोसेफ शाळेची वर्दी करणारे अनंत होसुरकर यांना प्रवासादरम्यान रस्त्यावर पडलेले पैसे होसुरकर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन परत केले. असलेल्या हजारो रुपयांच्या रकमेला हात न लावता रिक्षा चालक अनंत यांनी हा प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल सेंट जोसेफ शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते माजी पी टी ए सदस्य सुनील जाधव यांनी प्रामाणिक रिक्षाचालक अनंत याचा सत्कार करण्यात आला.St Joseph's auto driver

 belgaum

यावेळी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेच्या आजी माझी. पि. टी. ए. सदस्यांनी बोलताना विद्यार्थ्यांच्या समोर आदर्श निर्माण व्हावा अशी कृती आपल्या संबंधित असणारे सेंट जोसेफ शाळेची वर्दी करणारे अनंत होसुरकर यांनी आपल्या समोर ठेवली आहे. मतलबी झालेल्या दुनियेत प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चाललेला आहे. चंगळवादी संस्कृतीने माणसातील माणूसपण हरवला जात आहे या पार्श्वभूमीवर तथाकथित सामान्य कुटुंब म्हणता येईल अशा आर्थिक स्थितीत असणाऱ्या अनंत होसुरकर यांनी माणसाचं जगणं हे लोभावर अवलंबून नसून निष्ठेवर अवलंबून असते हे सिद्ध करून दाखवलं आहे. लोभ व्हावा अशी एक रक्कम त्यांच्या हातात आली असतानाही त्यांनी प्रामाणिकपणे परत करून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखविला समाज घडतो तो अशाच व्यक्तींच्या जीवावर समाज बिघडविण्याचे काम अनेकजण करतात अशा व्यवस्थेत समाज टिकला तो श्री अनंत यांच्यासारख्या व्यक्तींच्यामुळे जगण्यावर व माणसाच्या हसण्यावर नैतिकतेचे मोहर उठून होसुरकर यांनी मानवतेच्या महावस्त्राला सौंदर्याची किनार जोडली आहे. या आदर्श व्यक्तीकडून अनेक गोष्टी शिकू शकतो त्यांच्यातला हा प्रामाणिकपणा गुण प्रत्येकाने आपल्यात बनवावा अशी इच्छा व्यक्त करतो. असे उपस्थितांना सांगितले.

यावेळी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेचे पि. टी. ए.उपाध्यक्ष संतोष गावडे परवेझ किणीकर,सुनील जाधव सतीश कलघटगी,नाझणीन सौदागर,सोनाली खोत,पराग चंदगडकर,तोफिक सय्यद, इरफान मुल्ला, पूर्वा सरनोबत,सविता खोत,प्रवीण मोदळ,शशिकांत मेलवनकी तसमीन मुल्ला,पवित्रा पुजारविनोद दबाळे,विशाल पाटील, यासह अन्य पालक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.