Wednesday, May 8, 2024

/

बेळगावात पावसाची संततधार; हवेत गारठा

 belgaum

गेल्या दोन दिवसापासून शहर परिसरात खऱ्या अर्थाने पावसाचे चांगले आगमन होत असून पहाटेपासून पावसाची रिपरीप सुरू झाली आहे. आज मंगळवारी तर पावसाचा जोर अधिकच संततधार सुरू झाल्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे.

पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याची तळी पहावयास मिळत आहेत. त्याचप्रमाणे अर्धवट विकास कामांच्या ठिकाणची चिखलाची दलदल अधिकच वाढण्याबरोबरच शहरातील प्रमुख रस्ते वगळता अंतर्गत बहुतांश रस्ते चिखलाने लाल भडक झाले आहेत.

त्याचप्रमाणे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे दुचाकी वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठी कसरत करत ये -जा करावी लागत आहे. पावसामुळे कांही ठिकाणच्या गटारी तुडुंब भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी तुंबलेल्या गटाऱ्यांचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. संततधार पावसामुळे शहरातील बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.Rain coldness

 belgaum

रस्त्यावरील भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाले यांची तारांबळ उडत असून छत्र्या, रेनकोटच्या सहाय्याने पावसापासून सुरक्षित रहात त्यांना कसाबसा आपला व्यवसाय करावा लागत आहे. सोमवारपासून दिवसभर ढगाळ वातावरण आणि दमदार सरी कोसळत असल्यामुळे हवेत मोठा गारठा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेनकोट छत्र्यांबरोबरच नागरिक उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. संततधार पावसामुळे शहर परिसरातील नदी नाले प्रवाहित होऊ लागले आहेत. पावसाला सुरुवात झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे शिवारातील कामे करण्यामध्ये शेतकरीवर्ग गुंतल्याचे पहावयास मिळत आहे.

दरम्यान, खानापूर तालुक्यामध्येही गेल्या दोन दिवसापासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात कणकुंबी येथे 77.6 मि.मी. इतका सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला आहे. तालुक्यातील लोंढा, गुंजी, आमगाव, पारवाड, कणकुंबी, शिरोली वाडा आदी जंगल भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे विद्युत खांब कोसळून पडत आहेत. त्याचप्रमाणे विजेच्या तारांचे नुकसान होत आहे. परिणामी या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

लोंढा गावात आज मंगळवारी सकाळी विजेचा एक खांब कोसळला. मात्र याबाबतची माहिती मिळताच हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी दाखल होऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. सध्या तालुक्याच्या घनदाट जंगलात रस्त्यांची सोय नसताना देखील हेस्कॉमकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.