बेळगाव शहरासाठी सतीश जारकीहोळी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्या नंतर जाहीर केलेल्या पहिल्या प्रोजेक्ट बाबत पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी दिल्ली मुक्कामी जारकीहोळी यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली बेळगाव सह राज्यभरातील रस्ते आणि उड्डाणपुलांचे अत्यावश्यक अद्ययावतीकरण तसेच विविध शहरांतील बायपास रस्त्यांच्या बांधकामाबाबत दोघांनी फलदायी चर्चा केली.
या भेटीत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या मंजुरीवरही चर्चा झाली.यामध्ये बेळगावमधील खालील तपशीलांसह समावेश आहे.
NH-48 किमी 492+000 ते 516+000 पर्यंत 24 किमी लांबीचा रस्ता बेळगाव शहराच्या हद्दीतून जातो.
बेळगाव हे कर्नाटक राज्यातील महत्त्वाचे शहर असून त्याची लोकसंख्या 7.50 लाख आहे.बेळगाव ही राज्याची दुसरी राजधानी म्हणूनही ओळखली जाते.
NH-48 वरील बेळगाव शहराच्या हद्दीतील सध्याच्या 6-लेनवरील रहदारीची तीव्रता सुमारे 70,000 PCU पेक्षा जास्त आहे, परिणामी या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते, त्यामुळे प्रवासाच्या वेळेत विलंब होतो, सेवेच्या पातळीत घट, वाहन चालविण्याचा खर्च (VOC) मध्ये वाढ यामुळे शहरातील अपघातांचे प्रमाण आणि प्रदूषणात वाढ झाली आहे.त्यामुळे NH-48 वरील बेळगावी शहराच्या हद्दीत 4-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरची निर्माण करा विनंती जारकीहोळी यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
जारकीहोळी यांनी कर्नाटक राज्यातील प्रलंबित असलेल्या विविध राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पावर चर्चा केली याशिवाय विविध उड्डाण पुले आणि योजना बाबत चर्चा झाली आहे त्या चर्चेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावेळी बेळगावचे काँग्रेस नेते सुनील हनमन्नावर उपस्थित होते.
या अगोदर बेळगावच्या प्रस्तावित फ्लाय ओव्हरचा प्रोजेक्टसाठी जारकीहोळी यांनी आराखडा बनवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत आराखडा बनवल्या नंतर याबाबत प्रस्ताव तयार केला जाणार आहे.उड्डाण पुलांची बेळगाव शहरातील संख्या वाढल्यास रहदारीची समस्या तर सुटणारच आहे.या शिवाय शहरालगतची सुपीक जमीन संपादन देखील कमी होणार आहे त्यामुळे उड्डाण पुलांच्या योजनेला शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.एकूणच बेळगाव उड्डाण पुलाच्या योजने बाबत सतीश जारकीहोळी यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.