belgaum

GITच्या माजी विद्यार्थ्याची IAS कडे झेप; UPSC परीक्षेत 53 वा रँक

0
579
 belgaum

बेळगाव लाईव्ह :
बेळगावच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी ठरावी अशी कामगिरी गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (GIT) च्या माजी विद्यार्थ्याने केली आहे. चिकोडी तालुक्यातील हत्तरवट गावचा किरण कामटे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत ऑल इंडिया 53 वा क्रमांक मिळवत आयएएसकडे दमदार झेप घेतली आहे.


बेळगावमधील जीआयटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या किरण कामटे याने अभियांत्रिकीच्या शिक्षणासोबतच विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. महाविद्यालयीन काळात राष्ट्रीय स्तरावरील टेक्नो-कल्चरल कार्यक्रम ‘युक्ती’च्या आयोजनात त्याने नेतृत्वाची भूमिका निभावली होती.

तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरेल अशा पायाने चालवता येणाऱ्या पाणी पंपावरील संशोधन प्रकल्पातही त्याने सहलेखन केले होते.
2014 ते 2018 या कालावधीत त्याने जीआयटीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू करत त्याने कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर अखेर देशात 53 वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

 belgaum


किरण कामटे सध्या कर्नाटक सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असून 2023 मध्ये केपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती. नोकरी सांभाळत त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू ठेवली आणि अखेर सहाव्या प्रयत्नात मोठे यश मिळवले.


चिकोडी तालुक्यातील एका छोट्या गावातून शिक्षण घेत देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धा परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवण्यापर्यंतचा किरण कामटे यांचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशामुळे बेळगावच्या जीआयटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.