Sunday, May 19, 2024

/

व्हॅक्सीन डेपोतील स्मार्ट सिटी योजनेच्या कामांचे चौकशीचे आदेश

 belgaum

व्हॅक्सीन डेपोतील स्मार्ट सिटीची कामे असतील किंवा झालेली बेकायदा वृक्ष तोड असे या सर्व कामांची चौकशी होणार आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या कामांचे चौकशीचे आदेश दिले आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सह महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी (दि. 20) व्हॅक्सिन डेपो परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत व्हॅक्सिन डेपोच्या आवारात बेकायदा कामे सुरू असल्याच्या तक्रारीची दखल घेत दोन्ही मंत्र्यांनी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी आणि स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांकडून कामांची माहिती घेतली.

 belgaum

आरोग्य विभागाची पूर्वपरवानगी न घेता हे काम करण्यात आल्याने आरोग्य अधिकार्‍यांनी याबाबत तक्रार केली. यावेळी मंत्री जारकीहोळी यांनी, टिळकवाडीतील व्हॅक्सीन डेपोत कोणतेही नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल.

हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. येथील औषधी झाडे तोडून वाहतूक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. स्मार्टसिटीचे काम यापूर्वीच थांबले असून ते यापुढे होणार नाही, यासाठी कार्यवाही करण्यात येईल. पोलीस या प्रकरणाचा तपास करतील. हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे. याबाबतची माहिती आम्हाला मिळाली आहे.

तपासाच्या आधारे संबंधित विभागातील दोषी अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल. यंत्रणा राजकीय दबावाखाली असू शकते. आता जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामधून सत्य बाहेर येईल.

राज्याची सिस्टम केंद्राकडून हॅक! : सतीश जारकीहोळी

तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना  सत्तेवर आलेल्या काँग्रेसची सिस्टम केंद्राकडून हॅक करण्यात आली आहे, तशी केंद्राची ‘डील’ठरली आहे अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली.

व्हॅक्सिन डेपो मध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बेकायदेशीर रित्या काम केल्याचा आरोप करत स्मार्ट सिटीच्या तीन व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात आज सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण विकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्हॅक्सिन डेपो परिसराचा पाहणी दौरा केला. यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, गेल्या २ ते ३ वर्षात स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालकांनी बेजबाबदारपणे काम केले आहे. झाडांची बेकायदेशीर रित्या कत्तल केली आहे. येथील वारसा स्थळे नष्ट केली आहेत. या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यात आली होती. मात्र राजकीय दबावामुळे त्यांच्यावर कारवाई करणे शक्य झाले नाही. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.Satish jarkiholi

बुडा आयुक्तांविरोधातही तक्रार पुढे आली असून गेल्या १५ दिवसांपासून तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. यासंदर्भात बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, त्यांच्यावर देखील एफआयआर दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

याचवेळी काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नांवरही सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या अन्नभाग्य योजनेअंतर्गत दिला जाणाऱ्या तांदळासाठी केंद्राकडे २ लाख टन तांदळाची मागणी करण्यात आली आहे. केंद्राकडे ७ लाख टन तांदूळ साठा उपलब्ध असूनही केंद्राने हि मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे आदेशात म्हटले आहे. केंद्राकडून कर्नाटकाला अनुदान देण्यातही दुजाभाव करण्यात आला आहे. केंद्राकडून दिली जाणारी दुजाभावाची वागणूक या विरोधात आज काँग्रेसने आंदोलन छेडले आहे, असे त्यांनी सांगितले. येत्या १ तारखेपर्यंत किंवा २-४ दिवसाच्या फरकाने तांदळाचा नक्की पुरवठा केला जाईल असे त्यांनी सांगितले. मोफत वीज युनिटसंदर्भात बोलताना ते म्हणाले, कि मार्च मध्ये वाढीव वीजदराची मागणी करण्यात आली होती. यात भाजपचा मोठा वाटा आहे. मात्र सिध्दरामय्यांनी दिलेल्या आश्वानांनुसार सर्व आश्वासने लवकरच नक्की पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहराच्या पाणी समस्येवर बोलताना त्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. पावसा अभावी अनेक ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली असून अनेक ठिकाणच्या बोअरवेलचे देखील पाणी आटले आहे. यामुळे येत्या आठवड्याभरात पाऊस पडला कि पाणी समस्या नियंत्रणात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी लवकरच संपूर्ण राज्यात नव्या बसेसची सोय करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी यावेळी आमदार राजू सेठ, बाबासाहेब पाटील, आदी उपस्थित होते.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.