Saturday, April 20, 2024

/

आज सायंकाळी निघणार वडगावातील चित्ररथ मिरवणूक

 belgaum

बेळगावच्या श्री शिवाजी जयंती चित्ररथ मिरवणूक परंपरेनुसार वडगाव परिसरातील चित्ररथ मिरवणूक एक दिवस आधी म्हणजे आज शुक्रवारी सायंकाळी निघणार असून त्या अनुषंगाने विविध श्री शिवजयंती उत्सव मंडळ आणि जय्यत तयारी केली आहे.

पूर्वापार परंपरेनुसार शहरातील श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या एक दिवस आधी वडगाव परिसरातील चित्ररथ मिरवणूक काढण्यात येते. त्यानुसार यंदा बेळगाव शहराची चित्ररथ मिरवणूक उद्या शनिवारी 27 मे रोजी निघणार आहे. त्यामुळे वडगाव परिसरातील श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक आज शुक्रवारी सायंकाळी काढण्यात येणार आहे.

सदर मिरवणुकीमध्ये एकूण 9 चित्ररथ असणारा असून आज सायंकाळी ठीक 6 वाजता चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.

मिरवणुकीसाठी श्री शिवजयंती उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विविध सजीव देखाव्यांची तयारी केली असून पारंपारिक मराठमोळ्या वातावरणात ही मिरवणूक निघणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.