Friday, April 26, 2024

/

बेळगावमध्ये 12 जूनपासून ‘नाट्यमहोत्सव -2023’

 belgaum

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेतर्फे येत्या सोमवार दि. 12 ते शुक्रवार दि. 16 जून 2023 या कालावधीत दररोज सायंकाळी 6 वाजता ‘नाट्यमहोत्सव जून -2023’ चे आयोजन करण्यात आले आहे.

हॉटेल रामदेव च्या मागे शेख होमिओपॅथी कॉलेज समोर असलेल्या कन्नड भवन येथे या नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.

सदर नाट्य महोत्सवात पहिल्या दिवशी सोमवार दि. 12 जून 2023 रोजी हेमंत एदलाबादकर लिखित ‘चर्चा तर होणारच’ हा नाट्यप्रयोग होईल.Drama fest

 belgaum

दुसऱ्या दिवशी 13 जून रोजी प्राजक्त देशमुख लिखित ‘देवबाभळी’ हे नाटक, दि. 14 जून रोजी गो. पू. देशपांडे लिखित ‘उध्वस्त धर्मशाळा’ हे नाटक, तर 15 जून रोजी सुषमा देशपांडे लिखित ‘व्हय मी सावित्रीबाई’ हे नाटक सादर केले जाईल.

शेवटच्या दिवशी शुक्रवार दि. 16 जून रोजी ‘नाट्यगीत रजनी’ कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.