Thursday, December 5, 2024

/

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर! विद्यार्थिनी आघाडीवर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य पदवीपूर्व शिक्षण विभागाने पीयूसी द्वितीय वर्षाचे निकाल आज जाहीर केले असून राज्यभरात मुलींनीच आपला डंका बजावल्याचे या निकालावरून दिसून येत आहे.बेळगाव जिल्ह्यातील ७३.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून बारावी निकालात बेळगाव जिल्ह्याला २५वे स्थान मिळाले आहे तर संपूर्ण राज्यात दक्षिण कन्नड जिल्ह्याने प्रथम स्थान मिळवले आहे.

कर्नाटक शाळा साक्षरता विभागाचे महासचिव रितेशसिंग यांनी आज निकाल जाहीर केला असून लिंगराज महाविद्यालयाची कला आणि वाणिज्य विभागाची विद्यार्थिनी प्रियांका कुलकर्णी हिने ५९२ गुण मिळवत राज्यात पाचवा क्रमांक, बैलहोंगल येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यायाची विद्यार्थिनी सहाना कडकोळ हिने ५९२ गुण मिळवत राज्यात सातवा क्रमांक पटकाविला आहे.

एकूण ७०२८२१ विद्यार्थी या परीक्षेला बसले होती. यापैकी २३७५४ विद्यार्थी गैरहजर होते. एकूण ५२४२०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. खाली दिलेल्या लिंकवर आपल्याला बारावीचा निकाल पाहता येईल. www.karresults.nic.in अथवा https://kseab.karnataka.gov.in/

राज्यातील बारावीचा निकाल 74.67 टक्के; यंदाही मुलींची बाजी

राज्यातील यंदाच्या 2022 -23 या शैक्षणिक वर्षाचा बारावीचा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तो 74.67 टक्के इतका लागला आहे. शैक्षणिक जिल्ह्याच्या टक्केवारीत राज्यात चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा 78.76 टक्क्यांसह 16 व्या क्रमांकावर तर बेळगाव 73. 98 टक्क्यांसह 25 व्या क्रमांकावर आहे. या परीक्षेत यंदा देखील मुलींनी बाजी मारली असून मुलांच्या 69.05 टक्क्यांच्या तुलनेत 80.25 टक्के इतक्या अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता जारी असल्यामुळे यावेळी शिक्षणमंत्र्यांऐवजी शिक्षण खात्याचे मुख्य सचिव आणि कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन निर्णय मंडळाच्या चेअरमननी आज सकाळी 10 वाजता बारावीचा निकाल जाहीर केला. राज्यात 2022 -23 या शैक्षणिक वर्षातील बारावीच्या परीक्षेस 7,02,067 विद्यार्थी -विद्यार्थिनी बसले होते, त्यापैकी 5,24,209 उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी कला शाखेचा निकाल 61.22 टक्के इतका लागला असून कला शाखेच्या 220305 विद्यार्थ्यांपैकी 134876 विद्यार्थी विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल 75.89 टक्के लागला असून वाणिज्य शाखेतील 240146 पैकी 182246 विद्यार्थी विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील विज्ञान शाखेचा निकाल 85.71 टक्के इतका लागला असून विज्ञान शाखेतील 241616 विद्यार्थी विद्यार्थिनींपैकी 207087 जण उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 69.05 इतकी असून यावेळी 349901 इतके विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 241607 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी पुन्हा मुलींनी बाजी मारली असून 80.25 टक्के विद्यार्थिनींनी बारावीच्या परीक्षेत सुयश मिळविले आहे. संपूर्ण राज्यात 352166 विद्यार्थिनींपैकी 282602 विद्यार्थीनी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. मागील वर्षी उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची टक्केवारी 55.22 तर मुलींची टक्केवारी 68.72 इतकी होती. त्यात यंदा सुधारणा झाल्याचे पहावयास मिळाले

राज्यातील शहरी भागातील बारावीच्या परीक्षेचा निकाल 74.63 टक्के इतका लागला असून शहरातील 541807 पैकी 404349 विद्यार्थी विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागाचा निकाल 74.79 टक्के लागला असून ग्रामीण प्रदेशातील 160260 पैकी 119860 विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळविले आहे.

राज्यात कन्नड माध्यमाच्या (63.68 टक्के) तुलनेत इंग्रजी माध्यमाचा निकाल 82.30 टक्के इतका सरस लागला आहे. राज्यात गुणवत्तेसह प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्गात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या पुढील प्रमाणे आहे. गुणवत्तेत उत्तीर्ण (85 टक्क्यावरील) – 109509, प्रथम वर्ग (60 ते 85 टक्क्याखालील) – 247315, द्वितीय वर्ग (50 ते 60 टक्क्याखालील) -90014, फक्त उत्तीर्ण (50 टक्क्याखालील) – 77371. या पद्धतीने एकूण 5 लाख 24 हजार 209 विद्यार्थी यंदा बारावी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील 42 पदवीपूर्व महाविद्यालयांचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला असून 5 महाविद्यालयांचा निकाल ‘शून्य’ इतका लागला आहे. म्हणजे या पाच महाविद्यालयातील एकही विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झालेला नाही. त्याचप्रमाणे 10 अनुदानित पदवी पूर्व महाविद्यालयं आणि 264 विनाअनुदानित पदवी पूर्व महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तसेच अनुदानित 3 आणि विनाअनुदानित 36 महाविद्यालयांचा निकाल शून्य लागला आहे. थोडक्यात राज्यातील एकूण 117 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला असून 44 महाविद्यालयांचा निकाल ‘0’ लागला आहे.

राज्यातील विविध शैक्षणिक जिल्ह्यांची बारावीच्या परीक्षा निकालाची अनुक्रमे टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. मंगळूर -95.33 टक्के, उडपी -95.24, कोडगू -90.55, कारवार -89.74, विजयपुरा -84.69, चिकमंगळूर -83.28, हासन -83.14, शिमोगा -83.13, बेंगळूर ग्रामीण -83.04, बेंगलोर दक्षिण -82.3, बेंगळूर उत्तर -82.25, चामराजनगर -81.92, म्हैसूर -79.89, कोलार -19.2, बागलकोट -78.79, चिक्कोडी-78.76, रामनगर -78.12, बिदर -78, चिक्कबेळ्ळापूर -77.77, मंड्या -77.47, दावणगिरी -75.72, कोप्पळ -74.8, तुमकुर 74.5, हावेरी -74.13, बेळगाव -73.92, धारवाड -73.54, बेळ्ळारी -69.55, चित्रदुर्ग -69.5, कलबुर्गी -69.37, गदग 66.91, रायचूर 66.21, यादगिरी 62.98 टक्के. बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीसाठी राज्यात 65 तपासणी केंद्र स्थापन करण्यात आली होती. या केंद्रांमध्ये गेल्या 5 ते 15 एप्रिल दरम्यान एकूण 23,606 प्राध्यापकांकडून पेपर तपासणीचे काम पूर्ण करण्यात आले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.