Thursday, December 5, 2024

/

म. ए. समितीची ‘उत्तर’मध्ये निवडणूक नियोजनासंदर्भात बैठक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : रामलिंग खिंड गल्ली येथील उत्तर मतदार संघाच्या निवडणूक प्रचार कार्यालयात उत्तर मतदार संघाची निवडणूक नियोजन बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत प्रचार मार्ग, प्रचार सभा तसेच विविध कमिटी स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला उत्तर मतदार संघातील सर्व आजी माजी नगरसेवक. कार्यकर्ते आणि निवड कमिटी सदस्यांना बोलवण्यात आले होते. यावेळी निवड कमिटी सदस्यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. उत्तर मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीला यावेळी चांगली संधी मिळाली असून या मतदार संघावर महाराष्ट्र एकीकरण समितीचाझेंडा रोवण्यासाठी सर्वांनी जोमाने काम करण्याचा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे हे होते. यावेळी उत्तर मतदार संघाचे समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांना निवडून आणण्यासाठी सर्व ताकदीनिशी कार्य केले पाहिजे असे ठरविण्यात आले. शुक्रवार दि. २२ एप्रिल रोजी उत्तर मतदार संघाच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता करणार असल्याचे ठरविण्यात आले.

यावेळी समिती नेते प्रकाश मरगाळे  माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर,  गणेश ओउळकर , माजी नगरसेवक वैशाली हुलजी, विद्यमान नगरसेवक शिवाजी मंडोळकर, मोतेश बारदेशकर आदींनी आपले विचार मांडले .Nourth mes

या बैठकीला माजी महापौर संज्योत बांदेकर, नगरसेविका वैशाली भातकांडे , माजी नगरसेविका मीना वाझ, प्रभावती गवळी, मीनाक्षी चीगरे, ज्योती चोपडे, माया कडोलकर, रेणू मुतकेकर, किशोरी कुरणे, रेणू मोरे तसेच रणजित चव्हाण पाटील,

गजानन पाटील, सुनील बाळेकुंद्री, बसवंत हलगेकर, विजय बोंगाळे, अजित कोकणे , अनिल पाटील, अनिल धामणेकर आदींसह उत्तर मतदार संघातील मान्यवर, कार्यकर्ते, युवक संघटनांचे पदाधिकारी, महिलावर्ग उपस्थित होता. प्रास्ताविक पियूष हावळ यांनी केले तर रणजित चव्हाण पाटील यांनी आभार मानले..

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.