Friday, March 29, 2024

/

‘घुंगरू’ चित्रपटात दिसणार नृत्यांगना -अभिनेत्री रिया पाटील

 belgaum

चिंतामणी सिने क्रिएशन प्रस्तुत निर्माता लेखक बाबा गायकवाड यांचा ‘घुंगरू’ हा मराठी चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असून मराठी व कन्नड चित्रपट, वेब सिरीजमध्ये काम केलेली जैन कॉलेजची विद्यार्थिनी आणि बेळगावची सुप्रसिद्ध नृत्यांगना -अभिनेत्री रिया पाटील हिने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

लावणी साम्राज्ञी रिया पाटील ही मूळचे हलशी भांबार्डा (ता. खानापूर) येथील रहिवासी असलेले नेहरूनगर, मच्छे येथील प्रतिष्ठित नागरिक रामनिंग नरसिंग पाटील यांची कन्या आहे. तिचे माध्यमिक शिक्षण टिळकवाडी बेळगाव येथील हेरवाडकर हायस्कूल शाळेमध्ये तर पदवी पूर्व द्वितीय वर्षापर्यंतचे शिक्षण आरपीडी कॉलेजमध्ये झाले आहे. सध्या ती जैन कॉलेजमध्ये बी.कॉम. द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. नृत्य व अभिनयाची आवड असणारी रिया गेल्या 6 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून आतापर्यंत तिने मराठी व कन्नड चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.

‘सैकी’ या कन्नड चित्रपटांमध्ये तिने नायिकेची प्रमुख भूमिका साकारली असून येत्या 6 महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. स्थानिक निर्मिती असलेला ‘प्रेमाचा पाऊस’ हा तिचा मराठी चित्रपट तयार असून चित्रपटगृहांच्या तारखा मिळत नसल्याने त्याच्या प्रदर्शनास विलंब झाला आहे. मात्र येत्या दोन आठवड्यात तो प्रदर्शित होईल अशी अपेक्षा रामनिंग पाटील यांनी व्यक्त केली.Riya patil

 belgaum

रिया पाटील हिने ‘जुगलबंदी’ या मराठी वेब सिरीजमध्येही काम केले आहे. सदर 25 भागाच्या वेब सिरीजचे चित्रीकरण नुकतेच पुणे येथे पूर्ण करण्यात आले आहे. चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्याबरोबरच कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोव्यातील लावणीच्या मोठ्या शोंसाठी रियाला आवर्जून निमंत्रित केले जाते. आता ‘घुंगरू’ या मोठ्या प्रोडक्शनच्या मराठी चित्रपटात रिया पाटील झळकणार आहे. या चित्रपटाचे भव्य प्रमोशन काल गुरुवारी सांगली येथे करण्यात आले. त्यावेळी रिया पाटील हिचा बेळगावची नृत्यांगना अभिनेत्री असा आवर्जून खास उल्लेख करण्याबरोबरच चित्रपटातील तिच्या भूमिकेची प्रशंसा करण्यात आली.

चिंतामणी सिने क्रिएशन प्रस्तुत ‘घुंगरू’ या चित्रपटाचे निर्माता लेखक बाबा गायकवाड हे आहेत. तसेच दिग्दर्शक संदीप डांगे आणि कला दिग्दर्शक प्रशांत तोतला हे आहेत. या चित्रपटात मिसेस युनिव्हर्स इंडिया रूपल मोहतासह नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘घुंगरू’ हा चित्रपट लावणी कलावंतांच्या जीवनावर आधारित सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.