Wednesday, April 24, 2024

/

धीरज देशमुखांचा बेळगावात जय कर्नाटकचा नारा

 belgaum

राजहंस गड येथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला लातूरचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख उपस्थित होते.

त्यांनी मनोगत व्यक्त करून भाषणाचा समारोप करताना जय शिवराय, जय महाराष्ट्र असा समारोप केला. व्यासपीठावरून खुर्चीकडे जात होते. पण, त्यानंतर पुन्हा त्यांनी माईककडे येऊन जय बेळगाव, जय कर्नाटक अशी घोषणा दिली.

धीरज देशमुख यांच्या या घोषणेमुळे सीमाभागात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. जय कर्नाटकचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. राजहंस गड येथे भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अनावरण वरून राजकारण सुरू आहे.

 belgaum

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उद्घाटन केल्या नंतर काँग्रेस आमदारा कडून  ही रविवारी महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावून उद्घाटन केले. राजहंस गडावरून चाललेल्या राजकारणा वर समितीने आक्षेप घेत महाराष्ट्रातील नेत्यांना सहभागी होऊ नये असे आवाहन करण्यात आले होते तरीही महाराष्ट्रातील नेत्यांनी सहभाग घेतला सीमा वासियांच्या जखमेवर मीठ चोळले.Dheeraj Deshmukh

धीरज देशमुख यांचे वडील दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सातत्याने सीमाभागातील मराठी माणसांची बाजू मांडली. त्यांनीच पुढाकार घेऊन 2004 साली त्यांनी महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. त्यामुळे आमदार या नात्याने धीरज देशमुख यांनी पाठपुरावा करणे आवश्यक होते, पण सिमावासियांच्या भावना पायदळी तुडवून देशमुख यांनी बेळगावात येऊन जय कर्नाटक असा नारा दिला आहे, त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राजहंस गड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून भाजप आणि काँग्रेस मध्ये जोरदार राजकारण सुरू आहे. मराठी मते मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहे, अशा वातावरणात महाराष्ट्रातील आमदार बेळगाव येथे येऊन जय कर्नाटक अशी घोषणा देत असल्यामळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आमदार धीरज देशमुख यांनी सिमावसियांची मागणी धुडकावत बेळगावात जय कर्नाटकचा नारा दिला त्याला कोल्हापूरचे आमदार सतेज बंटी पाटील यांची साथ दिली. मराठी माणसाच्या जखमेवर महाराष्ट्र काँग्रेस जणांनी मीठ चोळले.त्यांच्या भूमिकेला हीच महा विकास आघाडीचा पाठिंबा आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.