Friday, April 19, 2024

/

महाराष्ट्राचे नेते बेळगावात दाखल!

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधाला झुगारून काँग्रेस नेते बंटी पाटील,छ्त्रपती संभाजी राजे, आणि लातूरचे आमदार धीरज देशमुख बेळगावात दाखल झाले आहेत.ज्या छ्त्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष महाराष्ट्र एकीकरण समिती करते त्यांचे वंशज छ्त्रपती संभाजी राजे राजहंस गडाच्या दुसऱ्यांदा होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत.त्यांच्या बरोबर कोल्हापूरचे आमदार बंटी उर्फ सतेज पाटील त्यांचं बरोबर लातूरचे धीरज देशमुख यांनी हजेरी लावली आहे.

राजहंस गडाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महाराष्ट्रीय नेत्यांनी मराठी आस्मिता जपणे गरजेचे आहे जिथे भारताचे पंतप्रधान मराठी माणसाच्या मनावर मीठ चोळत बेळगावी बेळगावी असा उद्घघोष करतात त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात ‘बेळगावी नव्हे बेळगावच’ असे ठासून सांगणे गरजेचे आहे.कर्नाटक प्रशासनानेही यापुढे समितीच्या कार्यक्रमाला येणाऱ्या कोणत्याही महाराष्ट्रीय नेत्यांना अडवता कामा नये, मराठी मतांचे राजकारण करू पहाणाऱ्या ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना आत्ताच मराठीचा इतका पुळका का आला?

या सगळ्या घटनांतून एक बाब मात्र लक्षात आली भाजपच्या प्रचाराला बेळगावात येणारे देवेंद्र फडणवीस असू देत किंवा आजच्या कार्यक्रमाला आलेले महाराष्ट्रीय नेते असू दे बेळगावचे राजकारण महाराष्ट्राशी जोडलेले आहे, यातून बेळगावचे महाराष्ट्र कनेक्शन अधोरेखित होत आहे ही बाब सुप्रीम कोर्टाच्या ही निदर्शनास आणून द्यावी लागेल.

 belgaum

कर्नाटकी राज्यकर्ते स्वतःच्या सोयीसाठी महाराष्ट्रीय नेत्यांना मात्र पद्धतशीर वापरत आहेत, आणि मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या रोडशोला स्थानिक मराठी लोकांचा आभाव होता हे ओळखूनच मोदींनी कन्नड भाषेत भाषणाची सुरुवात केली आणि ‘बेळगावी बेळगावी ‘असा सततचा उल्लेख केला .

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबई महाराष्ट्रापासून तोडू पहाणाऱ्या गुजरातला महाराष्ट्राने हिसका दाखवला होता त्याचा सल अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या वागणुकीत नेहमीच दिसून येतो.

Banty patil sambhaji rajeमहाराष्ट्राचे अनेक उद्योग या गुजराथी नेत्यांनी कमकुवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दुबळेपणाचा फायदा घेत गुजरातला पळवले. या अश्या वागण्याचाही मराठी माणसाच्यात मोठ्या प्रमाणात भाजप आणि काँग्रेस बाबतीत उद्रेक आहे.हा उद्रेक नजीकच्या काळी भाजप आणि काँग्रेस नेत्यांना नक्कीच भोवणार हे मात्र नक्की!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.