Thursday, October 10, 2024

/

आई-बाबा विना पोरक्या मुलाचे ‘यांनी’ स्वीकारले शैक्षणिक पालकत्व

 belgaum

शिक्षण हे माणसाच्या प्रगतीचे मुख्य साधन आहे. परंतु आजही अनेक मुले आर्थिक दुर्बलतेमुळे अथवा परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहतात. समाजाने ठरवल्यास एक एक मुलाला दत्तक घेऊन त्याचे शिक्षण पूर्ण करणे शक्य आहे. हाच आदर्श श्रीराम सेना हिंदुस्थान आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी घालून दिला आहे. आईवडिलांचे छत्र हरपलेल्या एका मुलाचे पालकत्व स्वीकारून त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.

कोंडुसकर यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेल्या मुलाचे नांव 11 वर्षीय ध्रुव गोपाळ माटले असे आहे. ध्रुव हा शानबाग हायस्कूलमध्ये इयत्ता 5 वी मध्ये शिकत आहे. आई-वडील वारल्यामुळे तो आपल्या आजी समवेत मंगाईनगर पहिला क्रॉस वडगाव येथे राहतो.

मंगाईनगर येथे पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आजपासून त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची सोय करून दिली आहे. त्यानिमित्ताने ते मंगाईनगर येथे गेले असता कार्यकर्त्यांकडून त्यांना ध्रुव माटले या मुलावर ओढवलेल्या परिस्थितीची माहिती मिळाली.Konduskar helps child

सदर माहिती मिळताच रमाकांत कोंडुसकर यांनी तडक ध्रुवचे घर गाठले. तसेच त्याची आस्तेने विचारपूस केली. शिक्षणाची आवड आहे का? तुला खूप शिकायचे आहे का? असे विचार न करताच ध्रुवने त्यांना होकार दर्शविला. घरी राहून शिकणार की हॉस्टेलमध्ये राहणार अशी विचारणा करतात आपण आजीजवळ घरीच राहून शिकणार असल्याचे ध्रुवने सांगितले. तेंव्हा रमाकांत कोंडुसकर यांनी आई-वडिलांना पोरक्या झालेल्या ध्रुवला वह्या -पुस्तक, पेन पेन्सिल वगैरे काही हवं का? असे विचारले.

तसेच कांहीही हव असेल तर माझ्याकडे माग मी तुला ते देईन असे सांगून चांगलं शिक्षण घेऊन मोठा हो. चांगल्या मुलांच्या संगतीत राहा, असा सल्ला दिला. त्याचप्रमाणे ध्रुवच्या यापुढील शिक्षणासाठीचे पालकत्व आपण स्वीकारत असल्याचे कोंडुसकर यांनी त्याच्या आजीला सांगितले. तसेच ध्रुवची शाळा, शाळेचे मुख्याध्यापक वगैरे सर्व माहिती गोळा करण्याची सूचना त्यांनी आपल्या सहाय्यकाला केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.