Thursday, April 25, 2024

/

बेळगावच्या ड्रॉइव्ही क्लस्टर उभारणीचा शुभारंभ

 belgaum

बेळगावला ड्रॉन्स आणि इलेक्ट्रिक वाहने निर्मितीचे जागतिक केंद्र (ग्लोबल हब) स्थापण्यात येणार असून त्यासाठीच्या डीआरओइव्ही-23 या कार्यक्रमाचा कर्नाटक डिजिटल इकॉनोमी मिशनच्या (केडीईएम) नेतृत्वाखाली आज बेळगावात शुभारंभ करण्यात आला.

जागतिक गुंतवणूकदारांना या क्षेत्राकडे आकर्षित करून स्थानिक उद्योग आणि भागीदारांची हात मिळवणी करण्याद्वारे जागतिक पुरवठा साखळीचा एक भाग बनणे हा डीआरओइव्ही-23 चा उद्देश आहे. ड्रोन्स आणि इलेक्ट्रिक वाहन (ड्रॉइव्ही) निर्मितीसाठी उपयुक्त वातावरण तयार करत असताना हे ड्रॉइव्ही क्लस्टर स्थानिक कौशल्य, बौद्धिक संपत्ती, उत्पादनं आणि नवकल्पना समोर आणण्यासाठीची एक उत्कृष्ट संधी असणार आहे.

मयूर बेळगाव रेसिडेन्सी क्लब येथे आज शुक्रवारी सकाळी त्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केडीईएमचे चेअरमन बी. व्ही. नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी राज्याच्या इलेक्ट्रॉनिक्स, आयटी -बीटी एस अँड टी खात्याचे मुख्य सचिव डॉ. ई. व्ही. रामना, केडीईएम सीईओ संजीव गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनी डीआरओइव्ही-23 कार्यक्रम, बेळगावात होणारे ड्रॉन्स आणि इलेक्ट्रिक वाहनं निर्मिती केंद्र यांचा उद्देश, महत्त्व आणि फायदे याबाबत मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. यावेळी डीआरओइव्ही-23 तर्फे क्लस्टर मधील उत्पादनातील गुंतवणूक प्रशिक्षण आणि आर अँड डी या संदर्भातील 16 हून अधिक लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) अर्थात उद्देशीय पत्रांची घोषणा करण्यात आली. सदर एलओआयची गुंतवणूक 400 कोटी रुपयांची असून त्यामधून बेळगावच्या ड्रोन्स आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मिती केंद्रात 10 हजारहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.Drove

 belgaum

ड्रॉइव्ही क्लस्टरच्या एलओआय असलेल्या बेळगावच्या उद्योग समूहांमध्ये रिमोट मोटर्स (अजित पाटील), विकास कंपोझिट्स (अरविंद कापडिया), ॲक्यु स्क्वेअर डिझाईन अँड टूलिंग (महानंद उप्पार), टोंची पॉलिमर्स (प्रकाश मुगळी), हेक्सलॅटिक मटेरियल्स प्रा. लि. (प्रकाश मुगळी), व्हर्जीनिया टेक इंडिया (डाॅ. एम. के. पद्मनाभन), जेएमसी (जवाजी एम.), व्हेगा एव्हिएशन (सुहास चांडक), सर्व्होकंट्रोल्स एरोस्पेस (दीपक धडोटी), ईमेलेज (बसव रेड्डी), मेलडथ ऑटो कंपोनंट्स प्रा. लि. (राकेश), फोकस इंजीनियरिंग (धनंजय एम.), केएलएस जीआयटी (राज बेळगावकर),

डीएफआय (स्मिता शाह), केएलई टेक (शिवयोगी तुरमुरी) आणि ओक्सा एनर्जीस (रणजीथ रवी) यांचा समावेश आहे. शुभारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी या सर्वांच्या नावाची घोषणा करून त्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते लेटर ऑफ इंटेंट प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमास निमंत्रित पाहुण्यांसह बेळगाव शहरासह जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.