Friday, March 29, 2024

/

निवडणूक काळातील मद्यवाहतुक रोखण्यासाठी चेकपोस्ट

 belgaum

बेळगाव लाईव्ह : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात गोव्याहून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मद्य वाहतूक होण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर मद्य वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी अबकारी खात्याने विशेष चेकपोस्ट उभारण्याण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्याच्या अबकारी अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील जांबोटी रोडवरील खासगी रिसॉर्टमध्ये ही बैठक झाली असून या बैठकीस गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकातील वरिष्ठ अबकारी अधिकारी उपस्थित होते.

गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमा एकमेकाला लागून असल्याने येथून बेकायदा मद्यविक्री मोठ्या प्रमाणात होते. ती रोखण्यासाठी गरजेच्या ठिकाणी विशेष चेकपोस्ट निर्मिती करण्यात येईल. शिवाय तिन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांमध्ये सातत्याने याबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचे देखील ठरविण्यात आले. गोवा, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, जत, सोलापूर तसेच गोव्याहून रामनगर, लोंढा, खानापूर, चोर्लामार्गे देखील मद्य वाहतूक होत असते. ही सर्व बेकायदेशीर मद्य वाहतूक रोखण्यासाठी एकमेकांमध्ये सातत्याने संपर्कात राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

 belgaum

या बैठकीला अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. मंजुनाथ, अरुणकुमार, जयरामेगौडा, एन. सी. पाटील, विजयकुमार हिरेमठ, रवी मुरगोड, अनिल नंदेश्वर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.