belgaum

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नियुक्ती केल्याचे भारतीय जनता पक्षाने आज शनिवारी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडू भाजप युनिटचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुका येत्या एप्रिल -मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी काँग्रेस पक्षाने आपल्या सार्वजनिक संपर्काची तीव्रता वाढविण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे भाजपमधील अनुभवी नेते आहेत. यापूर्वी भाजपने आपली सत्ता मोठ्या फरकाने अबाधित राखलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसह अन्य बऱ्याच निवडणुका त्यांनी यशस्वीरित्या हाताळल्या आहेत.

पक्षाचे माजी सरचिटणीस असणाऱ्या प्रधान यांचा बिहार, उत्तराखंड, झारखंड आणि कर्नाटकातील 2013 ची निवडणूक या विधानसभा निवडणुकींमध्ये सहभाग होता. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 2015 आणि 2018 साली ते आसामचे प्रभारी होते.Dharmendra pradhan

अतिशय कुशल राजकारणी म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र प्रधान स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत वाद मिटवून कर्नाटकातील पक्ष संघटना एकत्रित एकसंध करण्याद्वारे दक्षिणेतील आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी पक्षाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना अधिकाधिक बळ देतील ही अपेक्षा आहे. कर्नाटक हे एकमेव दाक्षिणात्य राज्य आहे जेथे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. भाजपने कर्नाटकात नेतृत्व संक्रमणाचा अवलंब करताना तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून जुलै 2018 मध्ये बसवराज बोम्मई या अनुभवी लिंगायत नेत्याला आणले.

येडीयुरप्पा यांनी सत्ता गमविली असली तरी त्यांची उत्तराधिकारीची संथ शैली अद्याप त्याच उंचीवर आहे. अलीकडेच त्यांची पक्षाची सर्वोच्च संस्था असलेल्या भाजप संसदीय मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.