Saturday, April 27, 2024

/

ज्योती महाविद्यालयात ग्रामीण आमदारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ग्रामीण भागात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सीमाभागातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित ज्योती महाविद्यालयाविरोधार्थ ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राजकीय स्वार्थापोटी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी आज ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक बोलाविण्यात आली होती.

माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने बोलाविण्यात आलेल्या या बैठकीत ग्रामीण मतदार संघाच्या आमदारांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यात आला. सीमाभागात हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि भविष्य घडविणाऱ्या या संस्थेवर राजकीय स्वार्थापोटी करण्यात आलेल्या संतापजनक विधानामुळे या संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसह संस्थेशी निगडित प्रत्येकाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

शिवाय या संस्थेने सीमाभागासाठी किती योगदान दिले आहे, याची जाणीवही लक्ष्मी हेब्बाळकरांना नसून अशापद्धतीने केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

 belgaum

यावेळी भागोजी पाटील, पुंडलिक पावशे, दीपक पावशे, नारायण सांगावकर, आर. सी. मोदगेकर आदींनी विचार मांडले. यावेळी बोलताना नारायण सांगावकर म्हणाले, खानापूर मधून आलेल्या बाईंनी बेळगावमध्ये येऊन एका नामांकित संस्थेविरोधात आपले अकलेचे तारे तोडू नये. ज्योती महाविद्यालयासंदर्भात माहिती नसलेल्या आमदारांनी अशी वक्तव्ये करू नयेत, अशा शब्दात नारायण सांगावकर यांनी निषेध व्यक्त केला.Jyoti college

याचप्रमाणे दीपक पावशे बोलताना म्हणाले, या महाविद्यालयाला परवानगी मिळविण्यासाठी माजी आमदार कै. प्रभाकर पावशे यांनी अनेक परिश्रम घेतले आहेत. अनेक मान्यवरांच्या परिश्रमातून या महाविद्यालयाची स्थापना झाली आहे. या महाविद्यालयाचा इतिहास आमदारांना माहीत नाही. त्यामुळे महाविद्यालयाचा इतिहास आमदारांनी सांगू नये, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी निषेध नोंदविला.

यावेळी नारायण सांगावकर, पुंडलिक पावशे, दीपक पावशे, भागोजी पाटील, दिलीप कांबळे, नवनाथ खामकर, आर. सी. मोदगेकर आदींसह महाविद्यालयाचे कर्मचारी आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.