belgaum

बेळगाव : बेळगावकर खवय्यांसाठी रोटरी क्लब तर्फे आयोजित करण्यात आलेल्या अन्नोत्सवाला खवय्यांचा अपूर्व प्रतिसाद लाभत आहे. विविध चालीरीती , रिवाज व परंपरांनी समृद्ध असलेल्या देशाची वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य शैलीसाठीही कीर्ती जगभर प्रसिद्ध आहे. देशाच्या विविध भागातील खाद्यपदार्थांची चव इच्छा असूनही तेथे जावून घेता येत नव्हती. परंतु आता रोटरीच्या अन्नोत्सवामुळे मात्र ते शक्य झाले आहे अशा अनेक प्रतिक्रिया अन्नोत्सवात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केल्या.

bg

आज अन्नोत्सवात फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन बसवराज विभूती, अक्षय कुलकर्णी, शरद पै, संदीप नाईक आणि उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडर ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी आणि मराठा रेजिमेंटच्या इतर अधिकाऱ्यांनी तसेच संरक्षण विश्लेषक मारूफ रझा यांनीही अन्नोत्सवाला भेट दिली. बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य अन्नोत्सवाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.Fashion show

रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने ६ जानेवारीपासून अंगडी कॉलेज मैदानावर सुरू करण्यात आलेल्या अनोत्सव या उपक्रमास रोज दीड हजाराहून अधिक नागरिक भेट देत आहेत. केवळ कर्नाटकच नव्हे तर महाराष्ट्र, गोवा, केरळ अशा विविध प्रांतातील सुमारे १७० खाद्यपदार्थांचे स्टॉल्स अन्नोत्सवात सहभागी असून रोटरी क्लबच्या वतीने सर्व स्टॉल्सचे उत्तमरीत्या व्यवस्थापन करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसात बेळगावमधील हजारो खवय्यांनी अन्नोत्सवाला भेट देऊन विविध अन्नपदार्थांचा आस्वाद घेतला आहे.

अन्नोत्सवाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नवीन रस्ता, ८०० हुन अधिक वाहनांची पार्किंगची सोय करण्यात आली असून १५ जानेवारी पर्यंत अन्नोत्सव सुरु राहणार आहे. अरिहंत हॉस्पिटल्सचे प्रमुख प्रायोजकत्व असून सहप्रयोजक इंडस अल्टम इंटरनॅशनल स्कूल, क़ेमको तसेच नितीन शिरगुरकर आणि गदायुद्ध चित्रपटाचा समावेश आहे.

अन्नोत्सव यशस्वी करण्यासाठी पराग भंडारे, योगेश कुलकर्णी, मनोज पै ,मुकुंद बंग, नितीन गुजर, सचिन बिच्चु,जयदीप सिद्धनावर ,तुषार कुलकर्णी, नितीन शिरगुरकर, बसवराज विभूती, अक्षय कुलकर्णी, शरद पै ,विशाल पट्टणशेट्टी, संदीप नाईक, अल्पेश जैन, नंदन भंडारी ,संतोष पाटील, मनोज मायकेल आणि सुनील मैत्रानी आदी रोटेरियन्स परिश्रम घेत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.