Monday, July 15, 2024

/

मंगळवारी शनी पालट निमित्त शनी मंदिरात विविध कार्यक्रम

 belgaum

मंगळवार दि.१७ जानेवारी रोजी शनी पालट होत असून शनी महाराज कुंभ राशीत प्रवेश करत आहेt.तीस वर्षांच्या नंतर शनी कुंभ राशीत प्रवेश करत आहे.यामुळे धनू राशीची साडेसाती संपणार असून मोन राशीला साडेसाती सुरू होणार आहे.

शनी पालट निमित्त बेळगाव येथील पाटील गल्ली येथील श्री शनेश्र्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तैलाभिषेक,शनी शांती,शनी होम,महापूजा आणि महाआरती आदी कार्यक्रम मंदिरात आयोजित करण्यात आले आहेत असे मंदिरातर्फे कळविण्यात आले आहे.

शनी पालट मुळे प्रत्येक राशीवर होणारा परिणाम पुढील प्रमाणे
मेष – शनि अकरावा येत आहे. ईस्टेट, पैसा , घरदार वाहन, जागा खरेदी या दृष्टीने उत्तम फळ देईल पण संततीचे बाबतीत जरा काळजी घ्यावी.

वृषभ – दशम स्थानी प्रवेश करत आहे.राजयोग कारक असल्याने सर्व बाबतीत शुभ आहे. नोकरी, व्यवसाय निमित्त प्रवास घडतील .सरकारकडून लाभ पण घराचे बांधकाम सुरू केल्यास अडचणी उद्भवतील.

मिथुन – भाग्यस्थानी येणारा शनि पैसा अडका व घरादाराच्या बाबतीत उत्तम आहे. पण सावकारी अथवा अनैतिक अर्थार्जन असेल तर मात्र त्रासदायक.

कर्क – शनि अष्टमातीत आहे .धन, दौलत, इस्टेट या दृष्टीने शुभ पण चोरी, अपघात ,गैरसमज आणि बदनामी यापासून जपावे लागेल.

सिंह – सप्तम शनी येत आहे. मशिनरी, कारखानदारीशी संबंध असेल तर अतिशय उत्तम. पती-पत्नीने एकमेकाला सांभाळून घेतल्यास भाग्य उजळेल. डोळ्यांची मात्र काळजी घ्या.

कन्या – शनी सहावा येत आहे .आर्थिक बाबतीत चांगली फळे देईल. नोकरी व्यवसायात अडचणी येतील पण शत्रू पिडेचा काही त्रास होणार नाही. दीर्घ काळ टिकणारे विकार उदभवतील.Shani temple

तूळ – पंचम शनी येत आहे. संतती सोबत वाद. वैवाहिक जीवनात गैरसमज .नोकरी ,व्यवसायात नव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल.

वृश्चिक- शनि सुख स्थानी येत आहे .ही छोटी साडेसाती असते त्यामुळे महत्त्वाची कामे अडतात. मातेच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वाहन आणि इस्टेट या बाबतीत हा शनिशुभ फलदायी आहे.

धनु – तिसरा शनि येत आहे. साडेसाती पूर्ण संपलेली आहे .यापुढील काळ अतिशय उत्तम व भाग्योदय कारक आहे. पण अति दूरवरचे प्रवास जपून करा.

मकर – धनस्थानी येणाऱ्या शनि मुळे आर्थिक आवक जरा मंदावेल. कमाई आणि खर्च यांचे योग्य नियोजन करा अन्यथा अडचणी वाढतील.

कुंभ – तुमच्या राशीत येणारा शनि तुमच्या जीवनाला महत्त्वाची शुभ कलाटणी देईल .पण सतत चढ-उतार जाणवतील. कर्ज आणि आजारपणापासून जपावे.

मीन – खर्च वाढतील. आर्थिक बाबतीत कपट, दगाबाजी, कारस्थान ,फसवणूक होण्याची शक्यता. पण एखाद्या संस्थेचे अथवा गावचे प्रमुख पद मिळण्याचे योगही दिसतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.