Saturday, April 27, 2024

/

बेळगाव मध्ये पिंक बसचे उद्घाटन

 belgaum

बेळगाव लाईव्ह: गेल्या अनेक दिवसांपासून महिलांसाठी विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अनिल बेनके आणि परिवहन मंडळाकडे मागणी करण्यात आली होती.

इनरव्हील क्लब त्याचप्रमाणे सौरभ सावंत, संतोष दरेकर, अवधूत तिडवेकर आदींच्या वतीने यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.

बेळगावमध्ये महिला वर्गासाठी पिंक बस उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके आणि परिवहन मंडळाचे विभागीय अधिकारी पी. वाय. नाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.Pink bus

 belgaum

या मागणीला अनुसरून प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने बेळगाव मध्ये पिंक बस ला सुरुवात करण्यात आली आहे. आज पासून संपूर्ण बेळगाव मध्ये महिलांसाठी विशेष असणाऱ्या पिंक बस धावणार आहेत . या बस सेवेचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा, असे आवाहन आमदार अनिल बेनके यांनी केले आहे.

भाजपचे कार्यकर्ते सौरभ सावंत यांनी परिवहन मंत्री श्रीरामलू यांच्याकडे देखील पिंक बससेवेसाठी पाठपुरावा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.