belgaum

जिजाऊ जयंतीनिमित्त माता बनल्या जिजामाता!
बेळगावमधील ‘या’ शाळेचा स्तुत्य उपक्रम           बेळगाव लाईव्ह : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

bg

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून श्री राजमाता को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्हाईस चेअरपर्सन सौ. प्रतिभा नेगिनहाळ या उपस्थित होत्या. यावेळी ‘मी जिजाऊ बोलते’ अंतर्गत जिजाऊंच्या भेशभुषेतील पालकांची स्पर्धा घेण्यात आली.

तत्पूर्वी ढोल ताशाच्या गजरात पाहुण्यांचे व सर्व स्पर्धकांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अलका जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.Jijabai jayanti

यावेळी विद्यार्थ्यांनि आणि मातांनी जिजामाता-शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भक्ती मनोहर देसाई यांचे विशेष सहकार्य लाभले.

शाळेतील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका फरीदा मिर्झा व सर्व शिक्षक वर्ग यांच्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शितल पाटील व आभार फरीदा मिर्झा यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.