Friday, April 26, 2024

/

पोलिसांवरील हल्ला; ‘त्या’ 33 जणांची निर्दोष मुक्तता

 belgaum

शहरातील जुने गांधीनगर येथे गेल्या जुलै 2015 मध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन उद्भवलेल्या तणाव सदृश्य परिस्थिती प्रसंगी पोलिसांवर हल्ला करून पोलीस वाहन पेटविल्याच्या आरोपातून रमाकांत कोंडुसकर यांच्यासह 33 जणांची बेळगावच्या नवव्या जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

रमाकांत जयवंत कोंडुसकर, प्रकाश रामचंद्र वंटमूरकर, पंकज मोहन जाधव, सचिन मारुती चव्हाण, सिद्धाप्पा चंद्रप्पा दोड्डमनी, जगदीश सुरेश रुडलबंदी, संतोष गजानन दोड्डमनी, राजू यल्लाप्पा चौगुले, अब्दुलखादर नजीरअहमद शेख, अस्लम जाफरसाब सर्जेखान, चमनशा गौससाब जांबोटी, समीरअहमद करीमसाब कित्तूर, साबीर अस्लम सर्जेखान, उमर मुसा सकली, मेहबूब बंदेनवाज हवालदार, सलीम गैबूसाब अरळीकट्टी, अल्ताफहुसेन इसाक सय्यद, अल्ताफ दस्तगीरसाब शहासाब, अल्ताफ मोहम्मदशफी बाळेकुंद्री, अझम शमशुद्दीन कलईगार, अश्फाक मेहबूब सानेवाले, इरफान खताल घोरी, समीरअहमद पठाण, आसिफ दस्तगीरसाब शासाब, इरफान महंमदहनीफ मेकलमर्डी, कुशल ज्योतिबा धुडूम, शिवा अर्जुन तरळे, सुमित संपत पाटील, तोफिक संगोळी, फईम इक्बालअहमद नाईकवाडी, अजहर शेख, सलाउद्दीन मणियार व बाशा मनियार (सर्व रा. गांधीनगर, बेळगाव) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.

सदर प्रकरणाची माहिती अशी की, माळमारुती पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक ज्योतिर्लिंग होनकट्टी आणि त्यांचे सहाय्यक पोलीस 17 जुलै 2015 रोजी गस्तीवर होते. जुने गांधीनगर येथील रिक्षा स्टॅन्डजवळ दोन गटांमध्ये हाणामारी होऊन तणाव वाढल्याची माहिती मिळाल्यामुळे होनकट्टी यांनी कंट्रोल रूमला माहिती देऊन अतिरिक्त फौजफाटा मागवून घेतला. त्यानुसार पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर आणि पोलीस निरीक्षक आर. बी. गोकाक हे फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मात्र समाजकंटक आणि पोलिसांवरच हल्ला करत 10 पोलिसांना जखमी केले तसेच वाहनांची नासधूस केली. त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक होनकट्टी यांचे पोलीस वाहन पेटविण्यात आले.

 belgaum

या प्रकरणात होनकट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 33 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी याप्रकरणी नवव्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपींवर कलम 143, 147, 148, 153 (ए), 353, 307, 332, 333, 436, 427 सहकलम 149 भादस आणि कलम 2 (ए) व 3 केपीडीपी कायद्याखाली दोषारोपपत्र दाखल केले.

मात्र आरोपीं विरोधातील गुन्हे साबित झाले नसून सबळ पुराव्या अभावी सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे 15 साक्षीदार, 17 कागदपत्रे व 7 मुद्देमाल सादर करण्यात आले. संशयितांतर्फे ॲड. प्रताप यादव ॲड. जहीरअब्बास हत्तरकी, ॲड. हेमराज बेंचनावर व ॲड. स्वप्निल नाईक यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.