belgaum

खानापूर साऊंड सिस्टिम असो.चे ‘यासाठी’ डीसींना निवेदन

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कार्यक्रम, सभा-समारंभांना एक टाॅप, एक बेस अशी साऊंड सिस्टिम बसवण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी खानापूर साऊंड सिस्टिम असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

खानापूर साऊंड सिस्टिम असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी इरफान तालिकोटी यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले.

तत्पूर्वी मागणीची तात्काळ पूर्तता करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना साऊंड सिस्टिम मालक कार्तिक खानापुरे यांनी, गेल्या दहा वर्षापासून साऊंड सिस्टिम मालकांनी प्रत्येकी 10 लाख रुपयांचे कर्ज काढून साऊंड सिस्टिम भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

 belgaum

मात्र अलीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करून साऊंड सिस्टिम लावण्यास पोलीस आडकाठी आणत आहेत. तसेच साऊंड सिस्टिम जप्त करत आहेत. त्यामुळे साऊंड सिस्टिम व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे.

भरीस भर म्हणून अव्वाच्यासव्वा दंड आकारला जात असल्यामुळे साऊंड सिस्टिम मालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, असे सांगून यासाठी एक टॉप, एक बेस अशी साऊंड सिस्टिम बसवण्यास रीतसर परवानगी दिली जावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, असे खानापुरे यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.