Saturday, April 20, 2024

/

एव्हिएशन इंडस्ट्रीतील यशाचे शिखर पादाक्रांत करणारा : प्रबल सुजे

 belgaum

बेळगाव लाईव्ह : अलीकडच्या काळात करियरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये करियर करायचे असेल तर योग्य प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे. बेळगावमधील ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ हि संस्था माफक दरात, उत्कृष्ट प्रशिक्षकांच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींचे भवितव्य घडवत आहे. प्रबल भारत सुजे या तरुणानेही याच संस्थेच्या माध्यमातून आपल्या करियरची दिशा ठरवली आणि आज एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये या तरुणाने अव्वल यश मिळविले आहे.

‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ बाबत माहिती मिळाल्यानंतर या संस्थेच्या माध्यमातून १ वर्षाचे प्रशिक्षण घेतले. संस्थेतील प्रशिक्षक जॉन, सुश्मिता, ओंकार आणि इतर सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले. १ वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर लागलीच बेंगळुरू येथील विमानतळावरील ग्राउंड स्टाफ साठी इंटरव्ह्यू दिला.

‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ कडून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे पहिल्या टप्प्यातच इंटरव्ह्यू राउंड पूर्ण करून नोकरीची संधी मिळविली. ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ च्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण इतक्या चांगल्या पद्धतीने देण्यात आले ज्यामुळे इंटरव्ह्यू देताना कमालीचा आत्मविश्वास आपल्याला मिळाला, असे प्रबल सुजे याने सांगितले.

सुरुवातीच्या काळात एव्हिएशन मधून करियर करण्यासाठी विविध संस्थांकडून माहिती घेतली. मात्र ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ या अकादमीमधून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि माफक फीची मुभा यामुळे एव्हिएशन इंडस्ट्रीमधील करियर आणखीनच सोपे झाले, असे प्रबलने सांगितले.

केंद्रीय विद्यालय क्रमांक २ मधून शालेय शिक्षण पूर्ण करून त्यानंतर ज्योती महाविद्यालयात पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केलेल्या प्रबल सुजे या तरुणाची निवड बेंगळुरू येथील विमानतळावर ग्राउंड स्टाफ या पदासाठी झाली आहे. ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ च्या माध्यमातून आपला करियरचा मार्ग सुकर झाल्याचे प्रबल सांगतो.Prabal suje

ज्या तरुणांना एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये करियर करायचे आहे त्यांनी ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ या अकादमीची निवड करावी, या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत आणि या संधीपर्यंत पोहोचण्यासाठी हि अकादमी योग्य मार्ग उपलब्ध करून देईल, हे निश्चित आहे, असे प्रबलने सांगितले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच ‘जॉब इंटरव्ह्यू’ आणि योग्य प्रशिक्षण मिळाल्यामुळे पहिल्या टप्प्यातच झालेली निवड याचे श्रेय ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ला जाते, असेही प्रबल सुजे याने सांगितले.

या अकादमीच्या माध्यमातून आजवर अनेक तरुण-तरुणींनी आपल्या करियरमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या तरुणांना या अकादमीच्या माध्यमातून खूप सहकार्य केले जाते. इतर एव्हिएशन प्रशिक्षण देणाऱ्या अकादमीच्या तुलनेत ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ अकादमीची फी अत्यंत माफक आहे. या अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरीची हमी देण्यात येते. शिवाय ज्याठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत त्याठिकाणी इंटरव्यू देण्यासाठी अकादमीचे मोठे सहकार्यही मिळते, हि या अकादमीची खासियत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.