Friday, March 29, 2024

/

सीमाप्रश्नी सुनावणी 7 किंवा 8 डिसेंबरला

 belgaum

कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात वारंवार लांबणीवर पडत असलेली सुनावणी 7 किंवा 8 डिसेंबर रोजी होणार आहे. पण या खटल्यातील त्रिसदस्यीय खंडपीठात पुन्हा एकदा कर्नाटकच्या न्यायमूर्ती यांची नियुक्ती झाली असल्याने सुनावणी होणार की लांबणीवर पडणार या प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

खटल्यात नवे खंडपीठ स्थापन करण्यात आले होते. पण आता पुन्हा नव्या खंडपीठात पुन्हा कर्नाटकच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी महाराष्ट्र शासनाने सर्वतोपरी तयारी केले असून सीनियर कौन्सिलर वैद्यनाथन आणि राकेश द्विवेदी यांच्यासमोर ब्रिफिंग करण्यात आलेले आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून या याचिकेसाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे उपस्थित राहण्यासाठी तयारी सुरू आहे.

7 किंवा 8 डिसेंबर रोजी कर्नाटक सरकारचा 12 या अंतिम अर्जावर सुनावणी होणार आहे. सीमा प्रश्नी सोडवण्याचा अधिकार संसदेला आहे, सुप्रीम कोर्टाला येत नाही, सुप्रीम कोर्टाला नाही असा अर्ज कर्नाटक सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केला आहे त्यावर सुनावणी व्हायची शक्यता आहे. पण कर्नाटकच्या न्यायमूर्तीमुळे सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.