Thursday, April 25, 2024

/

ट्रॅक्टर चालक युवकाचा मृत्यू

 belgaum

बेळगाव तालुक्यातील राकसकोप्प जवळील पुलावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला बसलेल्या ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बेळगावातील राकसकोप जवळ भरधाव वेगात असलेल्या ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला.

बेळगाव तालुक्यातील सोनोली गावातील विघ्नेश झंगरुचे वय 17 असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव असून तो आपल्या ट्रॅक्टरमध्ये राकसकोप्प जवळून निघाला असता त्याने समोरून येणाऱ्या लॉरीला रस्ता दिला आणि पुलावर उभा असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकची ट्रॅक्टरला धडक बसली.Tractor accident

 belgaum

त्यामुळे ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळून मोठे नुकसान झाले ट्रॅक्टर पुलाखाली कोसळले.

बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. विघ्नेशच्या मृत्यूमुळे सोनोली गावावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.