Friday, March 29, 2024

/

इमानी जाधव हिची खेलो इंडियामध्ये चमकदार कामगिरी

 belgaum

सिमर्स क्लब आणि एक्वेरियस क्लब बेळगावची होतकरू जलतरणपटू इमानी जाधव हिने तिरुवनंथपुरम, केरळ येथे नुकत्याच पार पडलेल्या महिलांच्या खेलो इंडिया दुसऱ्या मालिकेतील स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदविताना 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं हस्तगत केली आहेत.

भारत सरकार देशात दर्जेदार खेळाडू निर्माण होण्याबरोबरच क्रीडा क्षेत्राची उन्नती व्हावी यासाठी खेलो इंडिया या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत असते. खेलो इंडिया दुसऱ्या मालिकेतील महिलांसाठीच्या तिरुवनंथपुरम केरळ येथे पार पडलेल्या स्पर्धेत बेळगावच्या इमानी जाधव हिने पुढील प्रमाणे यश मिळविले.

100 मी. बॅकस्ट्रोक, 200 मी. बॅकस्ट्रोक आणि बॅग स्ट्रोक किक व पूल डेव्हलपमेंट इव्हेंट या तीन जलतरण प्रकारात सुवर्णपदक. 200 मी. इंडिव्हिज्युअल मिडले व 200 मी. बटरफ्लाय स्ट्रोक या दोन प्रकारात रौप्य पदक.Imani jadhav

 belgaum

इमानी जाधव ही शहरातील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पोहण्याचा सराव करते. तिला जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितेश कुडूचकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

खेलो इंडिया स्पर्धेतील यशाबद्दल केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, रो. अविनाश पोतदार, जयभारत फाउंडेशनचे जयंत हुंबरवाडी, लता कित्तूर, माणिक कापडिया, उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे आणि प्रसाद तेंडुलकर यांनी इमानी जाधव हिचे अभिनंदन करून भविष्यातील स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा देऊन सुयश चिंतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.