Sunday, September 8, 2024

/

एफएफसीचे उदात्त कार्य; कॅन्सर रुग्णाला मिळवून दिली मदत

 belgaum

फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर व अवधूत तुडवेकर यांनी शेवटच्या टप्प्यातील हाडाचा कर्करोग (फायनल स्टेज बोन कॅन्सर) असलेल्या बिच्चू गल्ली, शहापूर येथील एका महिला रुग्णांसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यामुळे संबंधित रुग्णाला डायपर्सचा जम्बो पॅक तसेच किराणा सामानासह उपचारासाठी 10 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.

बिच्चू गल्ली, शहापूर येथील 66 वर्षीय जयश्री कुलकर्णी यांना हाडाचा कर्करोग झाला असून तो अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जयश्री जास्तीत जास्त तीन ते चार महिने जगू शकतील असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

जयश्री या अविवाहित असून त्या आपला अविवाहित वयस्कर भाऊ आणि चुलत बहिणी सोबत बिच्चू गल्ली येथे भाड्याने राहतात. जयश्री यांच्या भावाला दमा असल्यामुळे ते काम करू शकत नाहीत. या कुलकर्णी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे माणुसकीतून घरमालकही त्यांच्याकडून भाडे घेत नाही. जयश्रीपूर्वी रुग्णसेवा मंडळामध्ये काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी लोकांच्या घरात स्वयंपाकिनीचे काम केले. त्यांना मिळणाऱ्या 800 रुपये पेन्शनवर तिघांचाही कसाबसा उदरनिर्वाह चालतो. हाडाचा कर्करोग शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे जयश्री या अंथरुणाला खिळून आहेत. ही सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या मदतीसाठी संतोष दरेकर व अवधूत तुडवेकर यांनी मदतीचे आवाहन केले होते.Darekar

या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यामुळे जयश्री कुलकर्णी यांना 120 डायपर्सचा जम्बो पॅक तसेच किराणा साहित्य आणि उपचारासाठी 10 हजार रुपयांची मदत फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या (एफएफसी) माध्यमातून करण्यात आली. सदर उदात्त कार्यासाठी मे. बेळगाव सर्जिकल्सचे सुनीलकुमार हिरेमठ, एम. के. पब्लिसिटीचे मालक एम. के. जैनापुरे, शितल बी., अरुणा एच., अनिल के., राहुल पी., नीरज एस., राजेश डी., राजेंद्र सिंग, निखिल के., सारंग के., सनल एस., संतोष एम., भारती बी., रोहिणी एस., नितीन एल., लक्ष्मी एस., रूपा पी., गौतम जी. वंदना एन. आरती एस. शांती व्ही., विद्या के., व स्नेहा यु. यांचे सहकार्य लाभले.

त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते व शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष माजी महापौर विजय मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते किरण निप्पाणीकर यांनी या उदात्त कार्याला हातभार लावताना स्वतः जातीने जयश्री कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविला.

विजय मोरे यांनी दरमहा जयश्री कुलकर्णी यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचे आश्वासनही दिले. या सर्व मंडळींचे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी आभार मानले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.