Sunday, September 1, 2024

/

सुळगा (हि.) येथे गॅस सिलेंडर स्फोटात दोघे जखमी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सुळगा (हिं.) गावामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

सिलेंडर स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांची नावे कल्लाप्पा पाटील (वय 62) व सुमन पाटील (वय 60) अशी आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

स्फोटाचा आवाज ऐकताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवले. सिलेंडर स्फोटाच्या घटनेनंतर घरातील सामानांची प्रचंड उलथापालथ होऊन ते सर्वत्र विखुरल्याचे पहावयास मिळाले.

खिडक्यांच्या काचा फुटून पडल्या होत्या. सदर घटनेमुळे घराचे व घरातील साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काकती पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.