बेळगावातील सुवर्ण विधान सौध येथे 19 डिसेंबरपासून 10 दिवसांचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या वर्षी अधिवेशन आयोजित करण्यासाठी अधिका-यांनी 37 कोटी रुपयांचा खर्चाचा अंदाज तयार केला आहे.
दरवर्षीच्या बेळगावातील अधिवेशनास कोट्यवधींचा चुराडा केला जातो यावर्षी साठी बेळगावच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 37कोटींचा खर्चाचा आराखडा तयार केला आहे.
बेळगाव येथील सुवर्ण सौध येथे १९ ते २९ डिसेंबर दरम्यान विधानसभेचे अधिवेशन होणार असून हिवाळी अधिवेशनासाठी हॉटेल, रिसॉर्टमधील सर्व खोल्या १८ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत बुक केल्या जातील.
2021 मध्ये, बेळगाव येथे आयोजित 10 दिवसांचे अधिवेशन 24 डिसेंबर 2021 रोजी संपले.
2021 च्या 10 दिवसांच्या अधिवेशनात 52 तास आणि 14 मिनिटे कामकाज झाले ज्यामध्ये 14 विधेयके मंजूर करण्यात आली.
केएलई सोसायटीच्या जेएनएमसी सभागृहात 2006 मध्ये पहिले सत्र झाले आणि या 16 वर्षांत 10 सत्रे झाली.बेळगाव येथील सुवर्ण सौध येथे अधिवेशन घेण्याचा खर्च-
2013 – 8 कोटी
2014 – 14 कोटी
2015 – 13 कोटी
2016 – 16 कोटी
2017 – 31 कोटी
2018 – 13.85 कोटी
2019 – सत्र आयोजित केले नाही
2020 – सत्र आयोजित केले नाही
2021 – 30-34 कोटी (अंदाजे)
2022 – 37 कोटी अंदाजे