belgaum

कपिलेश्वर तलावात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील कपिलेश्वर मंदिर परिसरातील नवीन तलावात आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच खडे बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तलावाच्या पाण्यात मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर स्थानिक नागरिकांनी याची माहिती दिली. समाजसेवक अवधूत तुडवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह तलावाबाहेर काढला.

त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह आपल्या ताब्यात घेतला आहे.

 belgaum

या घटनेची माहिती समजताच तलाव परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सदर मृत व्यक्ती कोण आहे आणि त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला,

याचा तपास खडे बाजार पोलीस करत आहेत. सध्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.