belgaum

खानापूर-अनमोड मार्गावर कार पलटी; एक गंभीर, दोघे जखमी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर-हेमाडगा-अनमोड मार्गावर मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. हेमाडगा फॉरेस्ट नाक्यापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर पाली गावच्या क्रॉसजवळ भरधाव वेगातील कारचे नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या कडेला जाऊन तीन वेळा पलटी झाली.

या अपघातात कारचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला असून एकाचा पाय गंभीर जखमी होऊन निकामी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. तसेच अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार खानापूरहून अनमोडच्या दिशेने जात होती. वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

 belgaum

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. “आपलं खानापूर”चे संपादक दिनकर मरगाळे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्वरित रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून जखमींना उपचारासाठी हलविण्याची व्यवस्था केली.

या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.