Saturday, April 27, 2024

/

महाराष्ट्र भाजपची बोटचेपी भूमिका सीमा प्रश्नाचे भवितव्य काय?

 belgaum

कर्नाटकातील सीमा भागात अडकलेल्या मराठी माणसांची भावना जाणून घेण्यासाठी येणाऱ्या सीमा समन्वयक मंत्र्यांचा दौरा रद्द झाला.

या दौऱ्याच्या रद्द करण्या मागे कर्नाटक भाजप आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री हेच सरस ठरले आहेत, तर महाराष्ट्र भाजपची बोटचेपी भूमिका समोर आली आहे. भावना जाणून घेण्यासाठी येणाऱ्या सीमा समन्वयक मंत्र्यांना ठोस भूमिका घेऊन येता आले नाही. हे सीमा वासियांचे दुर्दैव आणि शोकांतिका ठरली आहे. अशा परिस्थितीत सीमा प्रश्नाचे भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय नेत्यांची भेट घेतल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि रद्द करण्यात आलेला दोरा अशा परिस्थितीत सीमा प्रश्नाच्या खटल्याच्या बाबतीत कोणती भूमिका घेतली जाणार? असा प्रश्न उपस्थित झाला असून महाराष्ट्र भाजपा अशाच प्रकारची बोटचेपी भूमिका घेत राहिल्यास खटल्याच्या दृष्टीने वाईट परिस्थिती निर्माण होणार की काय असा संभ्रम सीमा वासियांमध्ये निर्माण झाला आहे.Maharashtra bjp

 belgaum

चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराज देसाई यांचा शो फ्लॉप होणार की काय अशी शक्यता लागून राहिलेली होती. कर्नाटकातील भाजपने आपणच महाराष्ट्र भाजपवर सरस असल्याचे यामध्ये दाखवून दिले आहे. एकीकडे सीमा प्रश्न खटल्याच्या तज्ञ समितीवर ही जाणकार नेत्यांना नेमण्यापेक्षा पोर सवदा खासदाराला नेमून वेगवेगळ्या पद्धतीने सीमा वासियांची बाजू डळमळीत करीत अन्याय करण्याचा प्रकार महाराष्ट्र भाजपने सुरू केलेला असताना हा दौरा यशस्वीपणे पूर्ण करण्यात महाराष्ट्र भाजपला अपयश आल्याने आता भाजपचे कोणते राजकारण सुरू आहे असा प्रश्न सीमा वासी यांच्यामध्ये निर्माण झाला आहे.

कर्नाटकात लवकरच निवडणूक येत आहेत कर्नाटकातील भाजपला कर्नाटक जनतेच्या मध्ये हिरो करण्यासाठी महाराष्ट्र भाजप कोणते राजकारण करत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला असून त्या संभ्रमाचे वातावरणात महाराष्ट्र भाजपने योग्य भूमिका न घेतल्यास भाजपच्या बाबतीत मराठी माणसांच्या मनातील जागा कमी होणार आहे असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.