Monday, November 25, 2024

/

समस्या मांडण्याची हुकली संधी…

 belgaum

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराजे देसाई यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे .

सीमा समन्वयक मंत्र्यांच्या दौऱ्यावरून एकंदर सीमा भागात चैतन्याचे वातावरण पसरले होते बेळगाव परिसरातील मराठी भाषिक जनतेला आपल्या समस्या मंत्र्यांच्या समोर मांडण्याची ही नामी संधी चालून आली होती मात्र आता मंत्री बेळगावात येणार नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

या दौऱ्याच्या माध्यमातून मंत्री बेळगाव परिसरातील सामान्य मराठी माणूस,साहित्य पत्रकार आणि एकंदर सीमा भागातील जी मराठी जनता आहे त्यांच्या समस्या जाणून घेणार होते यानिमित्ताने अनेक प्रश्न ज्या मराठी सीमा भागातील मराठी माणसांचे आहेत ते मंत्र्यासमोर मांडले गेल्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारला सीमावर्ती भागात मराठी माणूस कशा पद्धतीने आपलं वास्तव्य करत आहे आणि कर्नाटकच्या सरकारच्या वरवंट्याखाली कसा खितपत पडला आहे हे दिसून आलं असतं या सर्व पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द होणे म्हणजे मराठी माणसाला आपली व्यथा सांगण्याची जी संधी होती त्याला कुठेतरी फाटा मिळाला आहे.Chandrakant dada patil

काही प्रमाणात हा दौरा रद्द होणाऱ्या मराठी माणसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या दौऱ्यातून सीमा समन्वयकांच्या माध्यमातून काही सोयी सवलती मराठी जनतेसाठी लागू करून घेण्यात मदत झाली असती मात्र त्यासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.

समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून बेळगावकरांच्या समस्या महाराष्ट्र दरबारी पोचल्या असत्या मात्र दौरा रद्द झाल्याने ही संधी आता हुकली आहे त्यामुळे आता पुढचा दौरा कधी होणार आणि सीमा भागाला महाराष्ट्राचे मंत्री कधी भेट देणार याकडेच सीमावासीयांचे डोळे लागलेले आहेत.

महाराष्ट्र प्रदेश भाजपने बोटचेपी भूमिका घेतल्याने सीमा समन्वयक मंत्र्यांचा दौराचं रद्द झाला कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी ज्या प्रमाणे वक्तव्य केले त्या प्रमाणे जत च्या तलावात पाणी सोडून दाखवले सोलापूरातील कर्नाटक भवनासाठी दहा कोटींचा निधी मंजूर केला बोम्मई यांचे हे महाराष्ट्रावरील सर्जिकल स्ट्राईक कणाहीन महाराष्ट्र सरकारला दिलेली चपराक आणि दहा कोटी महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना दुखावणारे आहे.तीन तीन राज्य गुजरात आसाम आणि गोवा राज्यात फिरून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या एकनाथ शिंदे यांना बेळगावातील मराठी जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी येणाऱ्या मंत्र्यांच्या दौऱ्यात काय भीती दायक वाटले?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दररोज प्रसार माध्यमावर येऊन डरकाळ्या फोडणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेनेचे मंत्री व भाजपचे मंत्री आताच का शेपूट घालून पाठीमागे सरकले?हा जळजलीत सवाल सिमावासीय विचारत आहेत.एका बाजूला कर्नाटकाचे दणकट कृतिशील प्रतिमा उभारण्यात यशस्वी झालेले बसवराज बोम्माई आणि दुसऱ्या बाजूला गंड मिरवणारे  मंत्री आता यांच्यातील तुलना करण्याचे मराठी जनतेला राहवत नाहीत.

महाराष्ट्र सरकारच्या या एकंदर भूमिकेमुळे निराश झालेली बेळगावची मराठी जनता संतापली आहे.केवळ महाराष्ट्रात बसून वल्गना करण्याने सीमा प्रश्न सुटणार नाही तर ठोस सजग कृतिशील त्याला जोड असावी लागेल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.